एकतपुर केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

* *एकतपुर (वार्ताहर) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवले नगर एकतपुर या आयएसओ शाळेत आज दिनांक 28 जून 2024 रोजी एकतपुर केंद्राची शिक्षण परिषद मोठ्या उत्साही वातावरणात पार पडली
शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी एकतपुर ग्रामपंचायतचे कर्तव्यदक्ष सदस्य श्री सुरेश नवले हे होते कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सांगोला बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय लक्ष्मीकांत कुमठेकर हे होते कार्यक्रमाला माजी शिक्षण विस्तार अधिकारी श्री दिगंबर दत्तू गायकवाड, मा.विषय शिक्षिका सौ उज्वला सुभाष शिंदे, मा.सहशिक्षक श्री दगडू शामराव वाघमोडे हे आवर्जून उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले
त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवले नगर शाळेतील मुलींनी स्वागत गीत गाऊन सर्वांचे स्वागत केले त्यानंतर श्री दिगंबर गायकवाड साहेब, सौ उज्वला शिंदे मॅडम, श्री दगडू वाघमोडे सर यांचा एकतपुर केंद्राच्या वतीने सेवापूर्ती निमित्त सत्कार करण्यात आला तसेच ज्याप्रमाणे अकबराच्या दरबारात नवरत्न होते त्याप्रमाणे एकतपुर केंद्रात 50 रत्ने आहेत त्यातील काही मोजक्या शिक्षकांचा चांगला पेन व गुलाब पुष्प देऊन त्यांच्या चांगल्या कार्याबद्दल सत्कार करण्यात आला निरोप मूर्ती विषयी केंद्रातील शिक्षकांनी आपापली मनोगते व्यक्त करून सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकाप्रती कृतज्ञता व्यक्त केली व त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या
केंद्राच्या वतीने सत्कार केल्याबद्दल निरोप मूर्तींनी आपापली मनोगते व्यक्त केली त्यांनी सेवा करत असताना केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानले त्यानंतर शिक्षण परिषदेतील विषयावर वेगवेगळ्या शिक्षकांनी मार्गदर्शन केले शेवटी सर्वांचा एक ग्रुप फोटो घेण्यात आला व त्यानंतर श्री अनिल नवले गुरुजी यांनी शिक्षण परिषदेचे आभार मानले अशा प्रकारे उत्साही वातावरणात एकतपुर केंद्राची शिक्षण परिषद संपन्न झाली