*कै.वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालय सांगोला* *प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून मा.बापूसाहेब ठोकळे सरांनी केला वाढदिवस साजरा*

सांगोला तालुक्यातील बहुजनांचे झुंजार नेते, सामाजिक कार्यातील अग्रगण्य नेतृत्व मा. बापूसाहेब ठोकळे सर यांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रशालेतील सर्व गरजू गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून अनोख्या पद्धतीने वाढदिवस
साजरा करण्यात आला.
बापूसाहेबांनी एक नवीन विचार समाजामध्ये पेरलेला आहे. समाजातील अतिशय सामान्य लोकांसाठी तना-मनापासून काहीतरी करण्याची त्यांची एक तळमळ यामधून दिसून येते. बापूसाहेबांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. एवढेच नव्हे तर त्यांच्या या विचाराने प्रेरित होऊन समाजातील अनेकांनी एकत्र येऊन त्यांची ही विचारधारा अशीच पुढे प्रवाहित केल्यास एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, असा विश्वास प्रशालेचे मुख्याध्यापक रमेश पवार यांनी व्यक्त केला.
सदर कार्यक्रमासाठी प्रशालेच्या अध्यक्षा शिंदे काकी, सचिव शिंदे सर, माजी नगरसेवक व सर्वपरिचित व्यक्तिमत्त्व किशोर जी बनसोडे सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



