*ला.प्रा.धनाजी चव्हाण यांचा बेस्ट झोन चेअरमन पुरस्काराने सन्मान*

*ला.प्रा.धनाजी चव्हाण यांचा बेस्ट झोन चेअरमन पुरस्काराने सन्मान*
सांगोला ( प्रतिनिधी ) आंतरराष्ट्रीय लायन्स संघटना प्रांत ३२३४ ड १ रिजन १ झोन ५ झोन चेअरमन ( विभागीय सभापती) व सांगोला लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष ला.प्रा.धनाजी चव्हाण यांचा बेस्ट झोन चेअरमन पुरस्काराने कराड येथे संपन्न झालेल्या प्रांत ३२३४ड१ ‘सेवा सन्मान संध्या’ या समारंभामध्ये माजी प्रांतपाल ला.बाबासाहेब पवार यांचे हस्ते सन्मान झाला.
यावेळी प्रांतपाल ला.भोजराज नाईक- निंबाळकर , प्रांतपाल ला.एम.के पाटील ( नियुक्त ), प्रथम उपप्रांतपाल ला.विरेंद्र चिखले ( नियुक्त ) द्वितीय उपप्रांतपाल ला.राजेंद्र शहा – कांसवा ( नियुक्त) , प्रांत प्रशासकीय अधिकारी ला.मंगेश दोशी उपस्थित होते.
जगातील २५० हून अधिक स्वतंत्र देशात ४९५०० पेक्षा जास्त शाखा असणाऱ्या लायन्स आंतरराष्ट्रीय संघटनेच्या कार्यात सुसूत्रता यावी यासाठी प्रांतरचना केली आहे.त्यानूसार प्रांत ३२३४ड१ मध्ये सांगली, सातारा, सोलापूर ,कोल्हापूर रत्नागिरी व पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर तालुक्यांचा समावेश आहे. लायन वर्ष २०२३-२४ साठी प्रांताची ५ रिजन व २३ झोन मध्ये विभागणी आहे.
माजी प्रांतपाल व झोन पाचचे मार्गदर्शक ला प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर यांचे मार्गदर्शनाखाली ला.प्रा.धनाजी चव्हाण यांनी सामाजिक अभ्युदयासाठी,विविध उपक्रमांसाठी विभागातील क्लबला केलेले मार्गदर्शन प्रमाण मानून बेस्ट झोन चेअरमन सिल्व्हर अवार्ड प्रदान करण्यात आला.
या यशाबद्दल विभागातील क्लब पदाधिकारी व सदस्य यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.ला.प्रा.धनाजी चव्हाण यांचा या अगोदर आंतरराष्ट्रीय लायन्स क्लब एक्सलन्स,उत्कृष्ट लायन्स क्लब अध्यक्ष प्रांत ३२३४ ड १ झोन ४, उत्कृष्ट विभागीय लायन
प्रांत ३२३४ ड १ रिजन १,उत्कृष्ट प्रांत सामाजिक उपक्रम,प्रांत ३२३४ ड १ रिजन १,उत्कृष्ट लायन्स अध्यक्ष वक्तृत्व,प्रांत ३२३४ ड १ रिजन १ अशा विविध पुरस्काराने सन्मान झाला आहे.