रोटरी क्लब सांगोला यांच्या वतीने गरजू शेतकऱ्यांना खत वाटपाचा कार्यक्रम संपन्न…….

रोटरी क्लब सांगोला यांच्या वतीने गरजू शेतकऱ्यांना खत वाटपाचा कार्यक्रम संपन्न……
सांगोला:- रोटरी क्लब सांगोला यांच्या वतीने सांगोला येथे कृषी दिन साजरा करण्यात आला. या कृषीदिनानिमित्त सांगोला परिसरातील ५ गरजू शेतकऱ्यांना खताचे वाटप करण्यात आले.
हा कार्यक्रम घेण्यामागील उद्देश अध्यक्ष रो.इंजि. विकास देशपांडे यांनी सांगितला. तसेच रोटरी चे ज्येष्ठ सदस्य रो.डॉ. प्रभाकर माळी यांनी कृषी दिनाचे महत्त्व सांगितले.
या कार्यक्रमामध्ये जे गरजू शेतकरी आहेत व त्यांची पेरणी झाली आहे अशा लोकांची निवड करून त्या लोकांना खताचे वाटप करण्यात आले.
रोटरीच्या या कार्यक्रमाबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले व वेळेवर खत मिळाल्याने शेतीचे उत्पन्न वाढेल अशी आशा व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी रो.डॉ.प्रभाकर माळी,रो.C.A. के. एस.माळी ,रो.इंजि.विलास बिले रो. इन्जि. मधुकर कांबळे ,रो. इंजि.हमीद शेख,रो. संतोष भोसले रो विशाल बेले,रो. श्रीपती अडलिंगे,रो.संतोष गुळमिरे, रो.अरविंद डोंबे रो. शरणाप्पा हळळी सागर रो. मिलिंद बनकर, रो सचिन पाटकुलकर, रो निसार इनामदार, रो.ज्ञानेश्वर कमले आदी रोटरी सदस्यांनी सहभाग नोंदवला.
ज्ञ