महाराष्ट्र

भाळवणी येथील ग्रामीण रूग्णालयाचे बांधकाम लवकरात लवकर करण्याची आमदार डॅा. बाबासाहेब देशमुख यांची सभागृहात मागणी

 

मुंबईत सुरू असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात सांगोला विधानसभा मतदारसंघातील भाळवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रूग्णालय म्हणून मान्यता देण्यात आली. मात्र अजूनही इमारत बांधणीला सुरूवात झाली नसल्याने त्यासंदर्भात आज सांगोला विधानसभा मतदारसंघाताचे आमदार डॅा. बाबासाहेब देशमुख यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला.

 

त्याचबरोबर भाळवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे पालखी मार्गावरील खेड भाळवणी येथे स्थलांतरित करण्यासंदर्भात प्रस्ताव दिलेला असून त्यावर लवकरात लवकर कार्यवाही करण्याची मागणी सभागृहात आमदार डॅा.बाबासाहेब देशमुख यांनी केली. यावर लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन सभागृहात आरोग्य मंत्री मा.ना. प्रकाश अबिटकर यांनी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button