फॅबटेक पॉलिटेक्निकच्या उज्वल यशाची परंपरा कायम

फॅबटेक पॉलिटेक्निकच्या उज्वल यशाची परंपरा कायम
उन्हाळी परीक्षा २०२४ मध्ये १७५ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण
सांगोला : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई (MSBTE ) यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२४ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून फॅबटेक पॉलिटेक्निक मधील 5 विद्यार्थी विविध विषयात १०० पैकी १०० गुण घेऊन राज्यात प्रथम आलेले असून तब्बल १७५ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.या परीक्षेमध्ये तृतीय वर्ष मेकॅनिकल विभागामधून प्रथमेश दबडे व श्रीयश ढोले (९१.६७) यांनी संयुक्त पणे प्रथम क्रमांक ,मयूर आतकर (९०.२२) आणि अजित मासाळ (८९.३३) या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला .द्वितीय वर्ष मेकॅनिकल विभागातून ज्ञानेश्वरी गावडे (९१.२५ )सुरभी साखरे (९०.७५,) व प्रीतम बिळगीकर (८७.८८) यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन विभागातून द्वितीय वर्षाच्या ज्योती बंडगर (९३.३३), आदित्य तोंडले (९३.२२) आणि सायली ताटे या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला .तृतीय वर्षांमधील रोशनी हेंबाडे (८९.७६), सुजाता बंडगर (८८.७१) आणि निशांत जाधव (८८.३५) या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला .
सिव्हिल विभागामधून तृतीय वर्षाच्या हर्षवर्धन पाटील (८८.८९), गौरव घोगरे (७९.६७) ,उदयसिंह पाटील (७८.३३) या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला . द्वितीय वर्ष सिव्हिल मधून मुलींनी बाजी मारताना शिवानी साळुंखे (७३.२५) , साक्षी सूर्यवंशी (७२.६३) आणि सानिका रुपनर (७०.१३) यांनी अनुक्रमे प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.
प्रथम वर्षांमध्ये संचिता पवार (९३.८८), हर्ष हजारे (९१.१८) व ऋषिकेश डोके (९०.८२) या विद्यार्थ्यानीय अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला .
तसेच गणेश मासाळ याने ,प्रथमेश दबडे , प्रथमेश आलदर, श्रीयश ढोले व अजित मासाळ या विद्यार्थ्यांनी विविध विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविला.
फॅबटेक पॉलिटेक्निक हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी कटिबद्ध आहे. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेली रात्र अभ्यासिका , विषयवार प्रत्येक धड्यावर घेण्यात येणाऱ्या सराव परीक्षा , २० पेक्षा जास्त कंपनी बरोबर केलेल्या सामजंस्य करारमार्फत विद्यार्थ्यांना देण्यात येणारे औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन तसेच राधानगरी धरण , कोयना धरण , अदानी थर्मल पॉवर स्टेशन , गॅमेसा विंड टरबाइन येथील क्षेत्रभेटी , अमूल कॅटल फीड , अल्ट्राटेक सिमेंट या सारख्या प्रतिष्ठित कंपनीतील अधिकाऱ्यांचे व्याख्यान व कार्यशाळा यामुळे विद्यार्थ्यांच्या तंत्रशिक्षण ज्ञानात भर पडत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी मिळविलेले हे यश म्हणजे फॅबटेक ने राबविलेल्या शैक्षणिक उपक्रमाचे फलित आहे असे पॉलिटेक्निक चे प्राचार्य प्रा. तानाजी बुरुंगले यांनी सांगितले.
संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रुपनर, कार्यकारी संचालक दिनेश रुपनर , कॅम्पस डायरेक्टर डॉ संजय आदाटे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.