*संकल्प बहुउद्देशीय संस्थेच्या शैक्षणिक मदतीने विद्यार्थी भारावले…

संकल्प बहुउद्देशीय संस्था वासुद यांच्या वतीने वासुद महसूलमधील चारही शाळांना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दर्जेदार शैक्षणिक साहित्य देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत आर्थिक हातभार लावला.तसेच गरजू विद्यार्थ्यांना सायकली देऊन मदत केली.

 

जि.प.प्राथमिक शाळा बाबरसपताळवाडी,जि.प.प्राथमिक शाळा केदारवाडी,जि.प.प्राथमिक शाळा वासुद, हनुमान विद्यालय वासुद या चारही शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोनशे पानी सात वह्या,चित्रकला वही,रंगपेटी,पहिली व दुसरी तील सर्व विद्यार्थ्यांना या सर्व साहित्यासोबत मी वाचणारच ही अंकलिपी देऊन शैक्षणिक मदत केली.सर्व शैक्षणिक साहित्य अत्यंत दर्जेदार उपयुक्त दिल्याबद्दल शिक्षकांनीही समाधान व्यक्त केले.

गेल्या वर्षीही बाबरसपताळवाडीतील दोन विद्यार्थ्यांना सायकल भेट देण्यात आली.प्रविण घुटुकडे व महादेव प्रकाश केदार या दोन विद्यार्थ्यांना लांबून शाळेला येण्यासाठी सायकलचा उपयोग झाला.इतर शाळेतील विद्यार्थ्यांनाही सायकलचे वाटप करण्यात आले होते.याही वर्षी गरजू विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले.वीस वर्षांपासून अखंडपणे अविरत समाजसेवा,शिक्षणसेवा, निसर्गसेवा करणारी ही वासुदमधील युवाशक्ती खरंच कौतुकास्पद कार्य करत आहे.
जि‌.प.प्राथमिक शाळा बाबरसपताळवाडी येथील विद्यार्थी उपयुक्त शैक्षणिक साहित्य मिळाल्यामुळे भारावून गेले.त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.त्यांनी संकल्प बहुउद्देशीय संस्था वासुद या संस्थेचे अध्यक्ष व सर्व सदस्यांचे आभार मानले.

निसर्गाला आपण जपले तर निसर्ग आपल्याला जपेल.उन्हाळ्यातील प्रचंड वाढलेली दाहकता पाहता वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे,हे ओळखून शंभर झाडांचे वाटप गावात करण्यात आले.त्याचबरोबर चांगले संगोपन करणाऱ्या नागरिकांना बक्षीस देऊन सन्मानित करणार असल्याचे घोषित केले.

अनंत काणेकर म्हणतात, स्वतःसाठी जगलास तर मेलास, दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास.खरंच सामाजिक भान ठेवणारी युवा पिढी ही देशाची शान आहे.कारण समाजसेवेतच राष्ट्रसेवा लपलेली आहे.म्हणून बाबरसपताळवाडी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय बुंजकर सहशिक्षिका सावित्रा कस्तुरे यांनी या संकल्प बहुउद्देशीय संस्था वासुद यांच्या कार्याचा गौरव केला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button