सांगोला(प्रतिनिधी):- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बामणी ता.सांगोलाच्या विद्यार्थांनी महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी मध्ये घवघवीत यश संपादन केले. शाळेच्या दोन विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान पटकाविले.



यामध्ये 1) अर्णव चतुरगुण औताडे (राज्यात दुसरा), 2) वेदिका गोपीनाथ नागरगोजे (राज्यात दुसरी) तर 3) वेदांत नागनाथ हवेली ( जिल्ह्यात सातवा).
या यशाबद्दल सांगोला तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री सुयोग नवले साहेब, विस्तार अधिकारी श्री लक्ष्मीकांत कुमठेकर साहेब, भंडारी साहेब, मांजरी केंद्राचे केंद्रप्रमुख वैजयंती जाधव मॅडम, मुख्याध्यापिका वाघमारे मॅडम, वर्गशिक्षिका बडे मॅडम, बनसोडे सर, बिले सर, रुपनर मॅडम, सरगर मॅडम, कवडे मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य, ग्रामपंचायत सदस्य या सर्वांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.
Back to top button