रोटरी क्लब सांगोला यांच्यावतीने चार्टर्ड अकाउंटंट दिवस साजरा….

चार्टर्ड अकाउंटंट्स डे हा देशाच्या आर्थिक आणि आर्थिक क्षेत्रातील चार्टर्ड अकाउंटंट्सचे योगदान, उपलब्धी आणि अखंडता साजरा करण्यासाठी साजरा केला जातो. हे ICAI चे महत्त्व, आर्थिक स्थिरतेमध्ये CA ची भूमिका, सतत व्यावसायिक विकासावर भर देणारे आणि व्यवसायाला मार्गदर्शन करणाऱ्या नैतिक मानकांचे मार्गदर्शन करते.भारताच्या आर्थिक आणि आर्थिक क्षेत्रांना आकार देण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंटची भूमिका हि खूप मोलाची मानली जाते.सी. ए. . डे चे औचित्य साधून आज सांगोला रोटरी क्लब ने सांगोल्यातील सन्माननीय चार्टर्ड अकाउंटंट यांचा यथोचित सत्कार केला.
या कार्यक्रमांमध्ये रो.सी.ए.के.एस. माळी सो, सी. ए. उत्तम बनकर सो, सी. ए.ओम उंटवाले सो, सी. ए.तुषार ढेरे सो. यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक रो.ऍड. विशाल बेले यांनी केले.अध्यक्ष रो. इंजि.विकास देशपांडे यांनी कार्यक्रमाचे महत्त्व व हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश सांगितला. या प्रसंगी रो.डॉ. प्रभाकर माळी यांनी आर्थिक साक्षरते साठी लोकांना मार्गदर्शन करावे असे प्रतिपादन केले.
सत्काराला उत्तर देताना रो. सी.ए के.एस माळी यांनी आर्थिक साक्षरता याबाबत माहिती दिली व सर्व जण सहकार्य करतील असे आश्वासन दिले. याप्रसंगी सी. ए. उत्तम बनकर सो, सी. ए.ओम उंटवाले सो, सी. ए.तुषार ढेरे सो. यांनी आपली मते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रो. इंजि.मधुकर कांबळे यांनी केले.या कार्यक्रमासाठी सांगोला अर्बन बँकेचे बहुमोल सहकार्य लाभले. सांगोला अर्बन बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी य कामी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमासाठी रो.डॉ.प्रभाकर माळी,रो.C.A. के. एस.माळी ,रो.सुरेश अप्पा माळी,रो.इंजि.विलास बिले ,रो.इंजि.. मधुकर कांबळे ,रो. इंजि.हमीद शेख,रो. संतोष भोसले रो विशाल बेले,रो. श्रीपती अडलिंगे,रो.संतोष गुळमिरे, रो.अरविंद डोंबे रो. शरणाप्पा हळळी सागर रो. मिलिंद बनकर, रो सचिन पाटकुलकर, रो निसार इनामदार, रो.ज्ञानेश्वर कमले आदी रोटरी सदस्यांनी सहभाग नोंदवला.