रोटरी क्लब सांगोला यांच्यावतीने गोडसेवाडी येथे मोफत रक्त तपासणी शिबिर…

रोटरी क्लब सांगोला यांच्या वतीने रोटरीच्या नवीन वर्ष च्या प्रारंभी गोडसेवाडी येथे मोफत रक्त तपासणी शिबिर घेण्यात आले.
नूतन अध्यक्ष रो. इंजि.विकास देशपांडे यांनी प्रास्ताविक केले .त्यानंतर प्रमुख पाहुणे डॉक्टर उत्तम फुले सो वैद्यकीय अधीक्षक व डॉ.रो. प्रभाकर माळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या शिबिरामध्ये CBC,LFT, KFT, Sr. Calcium,Sr. Uric Acid, lipid profile, HbA1C आदींची तपासणी करण्यात आली. या शिबिरामध्ये जवळपास १२७ गरजूंनी सहभाग घेतला व अभूतपूर्व असा उत्साह नोंदवला.
ज्या तपासणी साठी खाजगी पथोलॉजी मध्ये अंदाजे २५००/- रुपये खर्च येतो या तपासण्या ग्रामीण रुग्णालय सांगोला यांचे सहकार्याने पूर्ण मोफत करण्यात आल्या.या आरोग्य तपासणी शिबिर साठी रो. डॉ. प्रभाकर (नाना) माळी, रो. डॉ.अनिल कांबळे ,डॉ.उत्तम फुले व रो.श्रीपती अदलिंगे यांनी पूर्णवेळ शिबिरासाठी दिला. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी RCC क्लब गोडसेवाडी व श्री.साधू गोडसे यांचे अनमोल सहकार्य लाभले.
या कार्यक्रमासाठी ग्रामीण रुग्णालयातील श्री.पापरकर,श्री.वैभव मोरे आदी तंत्रज्ञ हजार होते.या कार्यक्रमासाठी सांगोला रोटरी क्लबचे रो.डॉ.महादेव कोळेकर रो. इंजि. हमीद शेख, रो.इंजि.मधुकर कांबळे, रो.साजिकराव पाटील सर,रो. श्रीपती आदलिंगे रो. इंजि. विलास बिले,रो.इंजि.अशोक गोडसे,रो.अशोक नवले सर,रो.शरणाप्पा हल्लीसागर व गोडसेवाडी मधील संजय भाकरे तानाजी शिंदे आबा गोडसे विष्णू गोडसे राजाराम गोडसे विजय गोडसे, विपुल गोडसे, विठ्ठल गोडसे रुक्मिणी अदलिंगे सुनीता गोडसे शारदा गोडसे आदी ग्रामस्थ हजर होते .तसेच सदर कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका तांबोळी मॅडम व श्री पाटील सर हे उपलब्ध होते