सेवा सदन लाईफ लाईन व सांगोला तालुका पेन्शनर संघटनेतर्फे हृदयरोग शिबिराचे उद्घाटन संपन्न

सेवासदन लाईफ लाईन हॉस्पिटल मिरज मध्ये हृदय विकार, मधुमेह, रक्तदाब, ईसीजी, इको तपासणी केली जात असून, मोफत हृदयरोग निदान शिबिरामध्ये भाग घेतलेल्या रुग्णासाठी पन्नास टक्के दरात सेवा दिली जात आहे व त्यामुळे सेवा सदन लाईफ लाईन हे हृदयरोग निदानासाठी वरदान असल्याचे डॉक्टर अंजुम मुश्रीफ यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मा. शिक्षण विस्तार अधिकारी फ.नि. चांडोले हे होते.
सांगोला तालुका पेन्शनर संघटना व सेवा सदन लाईफ लाईन यांच्या संयुक्त विद्यमाने, पेन्शनर संघटना सांगोला कार्यालयात मोफत हृदयरोग निदान शिबिराचे आयोजन केले होते. सुरुवातीस प्रास्ताविक संघटनेचे संचालक दिनकर घोडके यांनी तर सर्वांचे स्वागत संघटनेचे अध्यक्ष वसंतराव दिघे, सल्लागार शंकर सावंत यांनी केले. यावेळी जेष्ठ नागरिकांसाठी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी जागेवर हृदयरोग निदान व्हावे व त्यांना सवलतीच्या दरात सेवा उपलब्ध करण्यासाठी हे शिबिराच्या आयोजन केले असे आरोग्य मैत्रीण श्रीमती रंजना मोरे यांनी सांगितले.
सदर प्रसंगी डॉक्टर रविकांत पाटील यांचे हृदयरोग या पुस्तकाची भेट संघटनेस देण्यात आली. यावेळी 97 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची मोफत तपासणी करण्यात आली. यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी व सेवानिवृत्त कर्मचारी, सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी सर्वांचे आभार संचालक एकनाथ जावीर यांनी मानले.