सांगोला तालुका इंग्रजी अध्यापक मंडळाकडून आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर; रविवारी पुरस्कार वितरण
सालाबाद प्रमाणे याही वर्षी सन 2023 24 या शैक्षणिक वर्षाचा इंग्रजी विषय आदर्श शिक्षक पुरस्कार सांगोला तालुका इंग्रजी अध्यापक मंडळा कडून जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय किडेबिसरी चे विद्यमान मुख्याध्यापक श्री हरिबा नामदेव कोळेकर व न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला चे विद्यमान पर्यवेक्षक श्री. दशरथ दामोदर जाधव यांना देण्यात येणार आहे अशी माहिती सांगोला तालुका इंग्रजी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष श्री. फिरोज आतार सर व सचिव श्री. बाळासाहेब नवत्रे सर यांनी दिली.
श्री कोळेकर एच. एन. यांनी 33 वर्षापासून इंग्रजी विषयाचे उत्कृष्ट अध्यापन केले आहे, त्याचबरोबर त्यांनी सामाजिक क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेली आहे. गरीब होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग, शैक्षणिक सहलीचे उत्तम नियोजन तसेच इंग्रजी विषयाचे सात वर्षे परीक्षक व दोन वर्षे नियामक म्हणून कार्य केले आहे. 15. 6. 2023 पासून ते मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत. श्री जाधव डी. डी. हे इयत्ता दहावी व नववीच्या वर्गास गेल्या 27 वर्षापासून मार्गदर्शन करीत आहेत. इयत्ता दहावीचा निकाल नेहमी90 टक्के पेक्षा अधिक लावला आहे. तसेच इंग्रजी विषयाचे टॉपर विद्यार्थी 95 गुणापर्यंत पोहोचवला आहे. त्यांच्या सेवेच्या कार्यकर्दीत त्यांनी इयत्ता दहावीचे तज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य केलेले आहे. तसेच गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना त्यांनी मदत केली आहे. सध्या ते पर्यवेक्षक पदावरती कार्यरत आहेत.
या दोहोंच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. हा पुरस्कार वितरण समारंभ व सांगोला तालुक्यातील प्रत्येक प्रशालेतून इंग्रजी विषयात प्रथम आलेल्या विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचा सत्कार सोहळा रविवार दिनांक 7 जुलै 2024 रोजी सिंहगड कॅम्पस कमलापूर येथे मान्यवरांच्या शुभ हस्ते सकाळी 10.00वाजता संपन्न होणार आहे, तरी या समारंभास तालुक्यातील सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थी यांनी उपस्थित राहावे अशी विनंती सांगोला तालुका इंग्रजी अध्यापक मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.