*नाझरा विद्या मंदिरमध्ये दहावीतील गुणवंत विद्यार्थी पालक सहविचार सभा संपन्न*

नाझरा(वार्ताहर):- विद्यार्थ्यांच्या गुणात्मक वाढीसाठी विविध प्रकारचे प्रयत्न प्रशालेच्या माध्यमातून केले जातात.विविध प्रकारच्या योजना सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली राबवल्या जातात.विद्यार्थी,शिक्षक व पालक हा त्रिवेणी संगम यशस्वीरित्या झाला तरच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा आलेख उंचावत जाणार आहे.वर्गात दररोज घडणाऱ्या अध्यापनाच्या विविध गोष्टींबाबत पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांसोबत चर्चा करायला हवी. तंत्रज्ञानाच्या युगात विविध प्रकारची माहिती मोबाईल मध्ये उपलब्ध असते. त्याला मोबाईल हाताळण्यास देत असताना आपणही त्याच्यासोबत असणे गरजेचे आहे.एकंदरीतच पाल्याच्या गुणवत्ता वाढीसाठी पालक व विद्यार्थ्यांचा सुसंवाद होणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक बिभीषण माने यांनी केले.
विद्यामंदिर प्रशालेत आयोजित केलेल्या गुणवंत विद्यार्थी, पालक,शिक्षक सहविचार सभेत ते बोलत होते.
या सहविचार सभेचे प्रास्ताविक सहशिक्षक चंद्रशेखर लिगाडे यांनी केले.प्रास्ताविकाच्या माध्यमातून सहविचार सभेच्या आयोजनाबाबतची मुख्य भूमिका त्यांनी मांडली.आपले विचार व्यक्त करताना दीपक शिंदे यांनी विविध उदाहरणांसहित पालक व समाजातील विविध घटकाची भूमिका कशी आहे याबाबत मार्गदर्शन केले.यावेळी उपस्थित पालकांमधून गुणवंत विद्यार्थ्यांबाबत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.
या पालकसभेस पर्यवेक्षक मधुकर धायगुडे,ज्येष्ठ शिक्षक विनायक पाटील,संभाजी सरगर,दिलावर नदाफ,वसंत गोडसे, मंजुश्री ओतारी,दिलीप सरगर,अतुल बनसोडे,संजय चौधरी, महालिंग सुनील जवंजाळ आदी उपस्थित होते.या सहविचार सभेचे सूत्रसंचालन सोमनाथ सपाटे यांनी केले तर आभार पर्यवेक्षक मधुकर धायगुडे यांनी मांडले.सहविचार सभा यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.