फॅबटेक इंजिनिअरींग मध्ये सिव्हील विभागांतर्गत गेस्ट लेक्चर संपन्न

सांगोला : फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस, कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅड रिसर्च, मधील सिव्हील विभागांतर्गत “ओपन चॅनल फ्लो” या विषयावर गेस्ट लेक्चर आयोजित करण्यात आले होते, अशी माहिती प्राचार्य डॉ. रवींद्र शेंडगे यांनी दिली. सिव्हील विभागांतर्गत “ओपन चॅनल फ्लो” या विषयावर गेस्ट लेक्चर देण्यासठी प्रा. हेमचंद्र रमेश पवार हे उपस्थित होते.
प्रा.पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन म्हणाले कि, सिव्हील इंजिनिअरिंग मध्ये ओपन चॅनल फ्लो आणि पाईप मधील प्रवाह फरक , प्रवाहाचे प्रकार , याबाबत माहिती सविस्तर माहिती उदाहरणासह दिली. ओपन चॅनेल नैसर्गिक असू शकतात किंवा मानवनिर्मित वाहतूक संरचनांमध्ये वातावरणाच्या दाबाने मुक्त पृष्ठभाग असतो.जसे कि , नदी मधील प्रवाह , पूर प्रवाह , धबधबे प्रवाह, मानवी रक्तातील प्रवाह यातील फरक समजून सांगितले . फ्लुइड मेकॅनिक्स आणि हायड्रोलिक्स विषयाच्या “ओपन चॅनल फ्लो” विषयावरील मूलभूत माहिती विस्तुत देण्यात आली. ओपन-चॅनल फ्लो, हायड्रोलिक्स आणि फ्लुइड मेकॅनिक्सची शाखा, मुक्त पृष्ठभाग असलेल्या नाल्यातील पाण्याचा प्रवाहाचा एक प्रकार आहे.
हा कार्यक्रम संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.अमित रुपनर, कार्यकारी संचालक मा.श्री.दिनेश रूपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे, प्राचार्य डॉ.रविंद्र शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व डीन अँकँडमीक डॉ. वागीशा माथाडा, सिव्हिल विभाग प्रमुख प्रा. माळी एस.एम., प्रा.शरद आदलिंगे ,कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. अमोल मेटकरी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ.सुजाता इंगोले यांनी केले.