रोटरी क्लब सांगोला कडून राजापुर आश्रम शाळेत वृक्षारोपण 

सांगोला- शहरातील रोटरी क्लब तर्फे श्री चौंडेश्वरी शिक्षण प्रसारक मन्डळ सांगोला संचलित सुंदर आश्रम शाळा राजापुर या ठिकाणी दिनांक ५ जुलै रोजी १०० रोपे प्रदान करुन प्रातिनिधिक स्वरुपात मान्यवरांच्या हस्ते रोपण करण्यात आले.
मागील वर्षी देखिल रोटरी क्लबने आश्रम शाळेस शंभर रोपे भेट दिली होती.या प्रसंगी आश्रम शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.अनिल कांबळे यानी उपस्थितांचे स्वागत करुन अध्यक्ष रो. इंजि.विकास देशपांडे यांचा सत्कार केला.रोटरी क्लब नियमितपणे अनेक सामाजिक उपक्रम घेत असुन आश्रम शाळेस त्यांचे नेहमी सहकार्य असते,असे डॉ.कांबळे यांनी सांगितले.घेतले.
अध्यक्ष रो.विकास देशपांडे यानी वृक्षारोपण ही काळाची गरज असुन प्रत्येक विद्यार्थ्यांने किमान एक झाड दत्तक घेवून त्याची पुर्ण जबाबदारी घ्यावी,असे मत व्यक्त केले.
या वेळी विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणात सहभाग नोंदवल्या बद्दल रो.प्रा.राजाभाऊ ठोंबरे यानी विद्यार्थी वर्गाचे कौतुक करुन लावलेल्या वृक्षाचे संगोपन व संवर्धन करण्याचे आवाहन विद्यार्थी व शिक्षकांना केले.रो.अरविंद डोंबे गुरूजी यानी बडबड गीत सादर करुन मुलाना उपक्रमात सहभागी करून घेतले. मुख्याध्यापक गायकवाड यानी प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले.या वेळी सचिव रो.इंजि.विलास बिले,रो.इंजि.अशोक गोडसे,अरविंद केदार आदि उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button