कडलास येथील अंगणवाडीची दुरावस्था ,बालकांचे आरोग्य धोक्यात

सांगोला प्रतिनिधी- सांगोला तालुक्यातील कडलास गावातील धोकादायक प्रकार. अंगणवाडीला स्वतंत्र इमारत नसल्याने जुनी दवाखान्याची इमारतीत अंगणवाडी वर्ग भरत आहे. दवाखान्याची ही इमारत जीर्ण अवस्थेत. इमारतीच्या खिडकी मोडलेल्या त्यातून वारंवार साप आत येत , अंगणवाडीतील साहित्ये चोरीला जाण्याचे प्रकार होत. आतील भिंतींची वाळू वारंवार निघते. पाऊसाळ्यात पाऊसाचे पाणी खिडकीतून आत येत असल्याने बालकांना अंगणवाडीत बसविणे जिकरीचे ठरत आहे.
गावात अनेक अंगणवाडी केंद्र आहेत. एका अंगणवाडीला स्वतंत्र इमारत नाही. एकमेव अंगणवाडीची जीर्ण इमारत आहे.या इमारतीची सुधारणा करण्याचा प्रयत्न झाला आहे. छताची दुरूस्ती करण्यात आली असली तरी इतर अनेक कामे झाली नसल्याने निधी व्यर्थ खर्च करण्यात आला असा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केला जात आहे. याशिवाय अंगणवाडीत बैठकीची सुसज्ज व्यवस्था नाही. यामुळे बालकाचे शिक्षणावर परिणाम होतो आहे. इमारतीच्या दुरवस्था संदर्भात बालकांच्या पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. परंतु प्रशासन ऐकायला तयार नाही. इमारतीची अवस्था कोंडवाडाप्रमाणे झाली आहे.
गावात नवीन अंगणवाडी इमारत मंजुर करण्यासाठी शासन स्तरावर प्रस्ताव देण्यात आला आहे. परंतु या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळाली नाही. इमारतीची दुरावस्था असल्याने अंगणवाडी सेविका आणि मदतनिसाची अध्यापनाची मानसिकता होत नाही.