…… आणि ‘सहयाद्री’ पुन्हा गजबजली ……..

सांगोला:- आज 15 जून रोजी राज्यभरातील शाळा सुरू झाल्या. सहयाद्री इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी व प्रवेशोत्सवाचे जंगी आयोजन केले होते. ढोलताशांच्या गजरात गुलाबपुष्प घेऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

 

विद्यालय आकर्षकपणे सजवले होते. फलकांवर आकर्षक चित्रे काढण्यात आली होती. उन्हाळयाच्या सुट्टीनंतर पुन्हा शाळेची घंटा वाजली व सहयाद्री पुन्हा एकदा गजबजली ! उत्साह व आनंदात शाळेचा पहिला दिवस सुरू झाला.

विद्यार्थ्यांचे स्वागत संस्थेच्या व्यवस्थापिका सौ.अनिता इंगवले, मुख्याध्यापिका प्रमोदिनी जाधव तसेच सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी केले. ससांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.शोभा मोरे यांनी कार्यक्रमांचे सुंदर आयोजन केले होते. कार्यक्रमांचे सुत्रसंचालन सौ.श्रृती हसबनीस यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button