एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत शितगृह अनुदानासाठी महाडीबीटी पोर्टल संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन
सोलापूर :- एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम सन 2024-25 अंतर्गत जिल्ह्यास शितगृह – कोल्ड स्टोरेज या घटकास मान्यता प्राप्त झाली आहे. या घटकांतर्गत खर्चाच्या 35 टक्के अनुदान आदा करण्यात येते. जिल्ह्यातील सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांनी शितगृह – कोल्ड स्टोरेजसाठी महाडीबीटी पोर्टल https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डी. एस. गावसाने यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
या योजनेच्या लाभाचे निकष पुढीलप्रमाणे -01. शेतकरी, शेतकरी उत्पादक गट, भागीदारी संस्था, मालकी संस्था,नोंदणीकृत स्वयंसहाय्यता गट, नोंदणीकृत उत्पादक संघ (ज्यामध्ये कमीतकमी २५ सदस्य असतील), शेतकरी उत्पादक कंपनी, 02. वैयक्तिक शेतकरी, भागीदारी संस्था, मालकी संस्था, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता गट (ज्यामध्ये किमान १५ सदस्य असतील), शेतकरी उत्पादक कंपनी, कंपनी, शेतकरी गट यांचेसाठी अर्थसहाय्य हे बँक कर्जाशी निगडीत असून (Credit linked back ended subsidy) बँक कर्जाच्या परताव्याच्या स्वरुपात अनुदान देय राहील.
शितगृहाचे ३ प्रकार असुन घटक, मापदंड, कमाल मर्यादा व अनुदान पुढील प्रमाणे – 01. नविन शितगृह युनिट प्रकार-१ (एकसारख्या तापमानात राहणाया उत्पादनासाठी प्रति चेंबर 250 टन पेक्षा जास्त ), 8000/- रुपये प्रति मे. टन, 5000 मे. टन प्रति लाभार्थी ,
02. शितगृह युनिट प्रकार २ – ( एकापेक्षा अधिक उत्पादने व तापमानासाठी ) (प्रति चेंबर 250 टन पेक्षा जास्त ) कमीत कमी 6 चेंबर्स पेक्षा जास्त (प्रति चेंबर 250 टन पेक्षा कमी ), 1000 रुपये प्रति मे. टन, 5000 मे टन प्रति लाभार्थी,
03. शितगृह युनिट प्रकार – ३ ( नियंत्रित वातारवणासाठी नविन तंत्रज्ञान राबविणे) 10000/- रुपये प्रति मे. टन, 5000 मे टन प्रति लाभार्थी. सर्व घटकासाठी खर्चाच्या 35 टक्के जास्तीत जास्त 50 लाख अनुदान आहे.