sangola

हिंदवी स्पोर्ट्स फाउंडेशन ची कराटे ब्लॅकबेल्ट परीक्षा व कलर बेल्ट परीक्षा संपन्न 

HTML img Tag Simply Easy Learning    
आषाढी एकादशी दिवस औचित्य साधुन काल बुधवार दि १७-जुलै २०२४ रोजी  मेरीगोल्ड इंग्लिश मेडीयम स्कूल गोडसेवाडी वर ही परीक्षा घेण्यात आली . यामध्ये -मेडशिंगी  मधील कृष्णाई अमर गोडसे व आर्या पंडीत पाटील यांनी ब्लॅकबेल्ट १ डिग्री  मध्ये यश मिळविले .
या परिक्षेमध्ये  ब्लॅकबेल्ट  साठी – * प्रोजेक्ट  हार्ड कॉपी, सॉफ्ट कॉपी एक्झरसाइज,पुषपस,नक्कल्स,ट्रेडिशनल  जोर  ,स्टॅन्स,पंचेस,स्टमक फिटनेस,चॉप्स,ब्लॉक्स, किक्स,टेक्निक , काता, कुमिते-फाइट ,धावणे ५०००मी (५km) ध्यान- साधन,कराटे शिस्तबद्ध संस्कार वर्ग  इत्यादी सराव घेण्यात आला .
 * कलर बेल्ट प्रकारात  खालीलप्रमाणे *
सांगोला येलोबेल्ट  -अनुष्का भंडारे, ऑरेंजबेल्ट – सानवी यादव ,साक्षी व्हरे ,ग्रीनबेल्ट -प्रजित पांडे ,पर्पल बेल्ट -राजवीर गायकवाड ,ब्राउनबेल्ट- वीरा इंगोले , जय शिंदे ,करण शिंदे  -या परीक्षेस पंच म्हणून सीनियर ब्लॅकबेल्ट  सत्यम बाबर, प्रतिक राजमाने, प्रणव राजमाने, श्रीराम कुलकर्णी,  जन्मेंजेय भगत आदिनी काम पाहिले.

मेरीगोल्ड इंग्लिश मिडियम स्कुल मधील संस्था अध्यक्ष गोडसे मॅडम, अविनाश फुले सर  प्रिन्सिप्ल मॅम फुले मॅडम व आदर्श शिक्षिका राऊत मॅडम व इंगवले मॅडम  , चांडोले मॅडम सर्व मेरीगोल्ड स्टाफ च्या वतीने ब्लॅकबेल्ट विद्यार्थ्यांचे सत्कार करुण पुढील कराटे ट्रेनिंग साठी खूप खूप शुभेच्या  दिल्या. या परीक्षेस मुख्य प्रशिक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देणारी हिंदवी स्पोर्ट्स फाउंडेशन संस्थेचे सचिव  किशोर केदार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!