solapur

भूजल सर्वेक्षण आणि यंत्रणा -53 व्या वर्धापन दिनानिमित्त रक्तादान शिबीर

HTML img Tag Simply Easy Learning    

सोलापूर :- भूजल सर्वेक्षण आणि यंत्रणा सोलापूर कार्यालयाचा 16 जुलै 2024 रोजी 53 वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला . वरिष्ठ वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ मुस्ताक शेख यांच्या मार्गदर्शना खाली वर्धापनदिनाचे औचित्य साधून कार्यालयातील सर्व कर्मचारी व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांनी रक्तदान शिबीर व वृक्षारोपण करून एक वेगळा उपक्रम केला.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे 53 व्या भूजल वर्धापण दिनानिमित्त डॉ मुस्ताक शेख वरिष्ठ भूवैज्ञानिक यांच्या अध्यक्षतेखाली नेहरू नगर ,विजापूर रोड, सोलापूर येथील वरिष्ठ भूवैज्ञानिक ,भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा  कार्यशाळेत सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचे एक रोपटे देऊन सत्कार करण्यात आला.  या कार्यशाळेतील  जिल्हा प्रयोगशाळेच्या आवारात वृक्षारोपन , व रक्तदान शिबीर तसेच विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या रक्तदान शिबीरात एकूण 25 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ मुस्ताक शेख ,सहाय्यक भूवैज्ञानिक श्री शशिकांत निंबाळकर, कनिष्ठ भूवैज्ञानिक  श्रीमती अनिता बनसोडे , तांत्रिक अधिकारी श्री विजय जाधव , व श्री बाळासाहेब गाडवे, प्रविण तिपरातकर ,श्री शैल बबलेश्वर,  श्री संभाजी शिंदे , श्री प्रकाश येळे  कर्मचार उपस्थितीत होते, अशी माहिती वरिष्ठ भूवैज्ञानिक सोलापूर डॉ मुस्ताक शेख यांनी दिली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!