झाले बहु, होतील बहु यासम हेच ते कोळेकर महास्वामीजी: प्रा. प्रबुद्धचंद्र झपके

श्री श्री 108 गुरुनिर्वाण रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी यांचा व माझा सहवास 2008 ते 2009 या सालापासून आला व ते सर्वसामान्यांचे असामान्य महाराज होते तसेच ते सर्व जाती धर्मात लोकप्रिय होते, त्यांनी धनगर, लिंगायत व इतर सर्व समाजातील व्यक्तींना दीक्षा दिली व अनेक भक्तांना त्यामध्ये मुस्लिम समाज सुद्धा त्यांनी आपलेसे केले व त्यामुळे त्यांच्यावर सर्व समाजाची निष्ठा होती व प्रत्येक धर्म व इतर धर्माचा ते आदर करत होते. व एक अपेक्षा विहिरीत कार्य करणारे एकमेव महाराज म्हणजे कोळेकर महाराज त्यामुळे झाले बहु, होतील बहु यासम हे च ते कोळेकर महास्वामीजी होते असे मत वीरभद्र मंदिर नाझरे ता . सांगोला येथे कोळेकर महास्वामीच्या श्रद्धांजली कार्यक्रमात प्रा. प्रबुद्ध चंद्र झपके यांनी व्यक्त केले. यावेळी 31 वे मताधिपती रुद्र पशुपती कोळेकर महाराज प्रमुख उपस्थित होते.
महा स्वामींची लोकप्रियता मी अनेक कार्यक्रमात म्हणजे स्वतः मुंबईच्या सप्ताह मध्ये अनुभवली आहे, त्यामुळे महास्वामिनी सांगितलेले विचार सर्वांनी आचरणात आणावे व सर्वांनी लिंग पूजा करावी असेही प्रा. झपके यांनी यावेळी सांगितले. सुरुवातीस महास्वामीच्या प्रतिमेचे पूजन शिवभक्त बसवेश्वर पाटणे व सौ पाटणे यांच्या हस्ते करण्यात आले तर 31 वे मठाधिपती रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी यांचे स्वागत पत्रकार रविराज शेटे व सरपंच संजय सरगर यांनी केले. यावेळी रविंद्र स्वामी, शिवय्या स्वामी सर, शिक्षक नेते अशोक पाटील, सरपंच संजय सरगर, आदर्श मुख्याध्यापक सिद्धेश्वर झाडबुके, बसवेश्वर पाटणे, बंडू स्वामी, अविनाश मोगले, नयना पाटील मॅडम, महालिंग पाटील इ. नी महास्वामीच्या कार्याबद्दल माहिती सांगून, सर्व जाती धर्मात लोकप्रिय असणारे एकमेव महाराज म्हणजे कोळेकर महाराज होते असे सांगितले.
सदर प्रसंगी आरटीओ रंगनाथ बंडगर, संजय महालिंग रायचुरे, बाळासो स्वामी, शरद स्वामी, शिवाजी स्वामी, अमोल स्वामी, रमेश भाऊ शिरदाळे, मुकुंद पाटील, अमोल साखरे, श्रेयस शेटे, गंगाधर जोंधळे, राजू पाटील, अशोक पाटील, प्रा. महेश विभुते, वसंत गोडसे, नामदेव बनसोडे, अतुल बनसोडे, संजय शेळके, भिमू पाटील, रावसाहेब चौगुले, रमेश भाऊ शिरदाळे, दिलीप शिरदाळे,भारत पाटील, अमर रायचुरे, नंदकुमार रायचूरे, वसंत चौगुले, लिंगाप्पा पाटील, शुभम गोडसे, रुद्र पाटणे ग्रामस्थ, वीरशैव समाज बांधव, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम तसेच महाआरती व महाप्रसाद वाटप करण्यात आला. सूत्रसंचालन सिद्धेश्वर झाडबुके यांनी केले.