sangolamaharashtrapolitical

*पुरोगामी विचारांचे खंदे समर्थक आ.भाई जयंत पाटील– डॉ.भाई‌ बाबासाहेब देशमुख*

  ७ जुलै रोजी कष्टकरी ,श्रमजिवी‌ जनतेचे  नेते आमदार‌ भाई जयंत पाटील साहेब यांचा वाढदिवस …भाईंना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा व भावी वाटचालीसाठी‌ मनपुर्वक सदिच्छा.
   महाराष्ट्राच्या राजकारणात अमुलाग्र बदल झालेला आसुन,राजकारणामध्ये आचार, विचार, पथ,प्रतिष्ठा व निष्ठा या गोष्टी फक्त भाषण करण्यासाठी व  दुसऱ्याला ज्ञान शिकवण्यासाठी  वापरतात की काय असे वाटु लागले आहे.आज राजकारणाचा स्तर उंचावण्याची गरज आहे परंतु  काही पक्षाचे नेते या कडे जाणुन बुजुन कानाडोळा करताना दिसत आहेत..कित्येक जण विचारांशी फारकत घेताना‌ दिसत आहेत.कित्येक जण पक्षाशी द्रोह करताना दिसत आहेत.मात्र महाराष्ट्राच्या  राजकीय पटलावर शेतकरी कामगार पक्ष व शेकापक्षाचे नेते मात्र आजही आपले वेगळेपण जपुन आहेत .आजही कष्टकरी , श्रमजिवी‌ जनतेच्या बाजुने खंबिरपणे उभे आहेत हे शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांचे वेगळेपण आहे…हाच पुरोगामी विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आमच्या पक्षाचे सरचिटणिस व अभ्यासु आमदार भाई जयंत पाटील साहेब करीत आहेत..आम्ही राज्यातील सर्व कार्यकर्ते त्या़ंच्या नेतृत्वाखाली  राजकारणाच्या माध्यमातुन समाजसेवा करण्याचे काम करीत आहोत.
   शेतकरी कामगार पक्ष हा छत्रपती शिवाजी महाराज,राजश्री  शाहु महाराज,महात्मा जोतिबा फुले,विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुरोगामी विचार पुढे घेऊन जात समाजसेवा करीत  आहे.समाजातील शेवटच्या घटकांचा विचार करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाने पुरोगामी  विचार अंगीकारले आहेत,सर्वधर्म समभाव जपण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाने पुरोगामी विचार अंगीकारले आहेत, सर्वाभिमुक विकास साधण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाने पुरोगामी विचार अंगीकारले आहेत,हे विचार आत्मसात करुन शेकापक्षाचे दिवंगत नेते स्व.एन.डी.पाटिल‌-सर,स्व.गणपतरावजी‌ देशमुख ऊर्फ आबासाहेब यांनी अलिकडच्या काळात जे राज्याच्या जनतेसाठी काम केले‌ ते इतिहिसात नोंद करण्यासारखे आहे त्यांच्याच पावलावर पाऊल टाकुन आमचे नेते आमदार भाई जयंत पाटील‌ साहेब काम करीत आहेत.राज्याच्या हिताचा पुरोगामी विचार पूढे घेऊन जात आहेत.भले ईतर पक्षाच्या तुलनेने शेतकरी कामगार‌‌ पक्ष‌ संख्येने लहान असेल,परंतु निष्ठा,विचार,आचार सामांन्य लोकांचा विश्वास या गोष्टिचा विचार केला‌‌ तर शेतकरी कामगार पक्ष व पक्षाचे नेते अव्वल स्थानी आहेत..हिच शेतकरी कामगार पक्षाची‌ पथ,विश्वासहृर्ताआहे..
    आमचे नेते व मार्गदर्शक आमदार‌ भाई जयंत पाटील साहेब  यांच्या संसदीय कामकाजाबाबत बोलायचे झाल्यास राज्यातील महत्वाचे प्रश्न ते सभाग्रहामाध्ये अभ्यास पुर्ण पध्दतीने मांडत असतात. सभागृहामध्ये कित्येक वेळेस नको त्या प्रश्नावर नको तेवढा वेळ चर्चा होताना‌ आपण पहात असतो.सभाग्रहाला न‌ शोभणारे वर्तन कित्येकाकडुन आपण पहात असतो परंतु आमदार भाई जयंत पाटील हे आशा नाहक प्रश्नावरती कधीही बोलताना किंवा सहभागी होताना दिसत नाहीत कधी गोंधळ करताना‌ दिसत नाहीत फक्त शेतकरी,कष्टकरी ,श्रमजिवी जनतेच्या प्रश्नावरती आवाज उठवताना आपणास पाहावयास मिळेल भाईंनी स्व गणपतरावजी देशमुख ऊर्फ आबासाहेब यांचे संसदिय कामकाजाची पध्दती अगदी जवळुन पाहिली आहे स्व.आबासाहेब सभागृहामध्ये आक्रस्ताळी पना न करता वेगवेगळ्या संसदीय आयुधांचा वापर करुन जनतेचे प्रश्न कसे मांडुन ते कशा पध्दतीने  सोडवायचे हे आमदार भाई जयंत पाटील साहेब यांनी जवळुन पाहिल्यामुळे स्व.आबासाहेबांच्या कामकाजाचा ठसा भाईंच्या कामकाजामध्ये पहावयास मिळत आहे‌.
   आ.भाई जयंत पाटील‌ साहेबांनी चालु पावसाळी अधिवेशनात एक महत्वाचा प्रश्न उचलुन धरला तो म्हणजे दुष्काळी भागातील चाराछावण्यांची अनेक वर्षे थकीत आसलेली बिले छावणी चालकांना मिळावीत या संदर्भात आमदार जयंत पाटील साहेबांनी लक्षवेधी मांडली व थकीत बिलाबाबत अभ्यास पुर्ण पध्दतीने मांडणी करुन सभागृहापुढे वस्तुस्थिती कागदपत्रांच्या पुराव्यानिशी दाखवुन दिली.व सरकारला छावणी चालकांची थकीत बिले देण्याचा निर्णय घ्यावा लागला .हि आहे शेतकरी कामगार पक्षाच्या कामाची पध्दत  हे कामकाज सर्व टिव्ही सोशल मिडीया यावरती प्रसारीत झाले आहे.
   शेतकरी कामगार पक्ष हा विचारधारेला अन्य साधारण महत्व देणारा पक्ष आहे.तो विचार म्हणजे पुरोगामी विचार या विचारावरती‌ राजकारण  समाजकारण करने कठिण जरी असले तरी शेकापक्ष व शेकापक्षाचे नेते पुरोगामी विचारांशी कधीही तडजोड करीत नाहीत.आसा हा सर्वसामान्यांच्या हिताचा पुरोगामी विचार समर्थपणे महाराष्ट्रात समर्थपणे पुढे घेऊन जाण्याचे काम शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातुन आमदार भाई जयंत पाटील साहेब करीत आहेत आंम्ही सर्वजण व राज्यातील पुरोगामी युवक संघटना त्यांच्या पाठिशी ख़ंबीरपणे उभे आहे याची ग्वाही आज भाईंच्या वाढदिवसानिमित्त देत आहे.व पुंन्हा एकदा भाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!