जि.प.प्रा.शाळा चांडोलेवाडी येथे शिक्षकांचे स्वागत व निरोप समारंभ संपन्न

सांगोला(प्रतिनिधी):– सांगोला शहरातील चांडोलेवाडी येथील प्राथमिक शाळेतील शिक्षक शासनाच्या नियमानुसार विनंती बदलीने बदलून गेले व त्यांच्या ठिकाणी विनंती बदलीने शिक्षक हजर झाले. त्यांचा निरोप समारंभ व स्वागत समारंभ एकत्रितपणे नुकताच साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजाराम बिरा मेटकरी हे होते.
महाराष्ट्र शासनाच्या नवीन नियमानुसार यावर्षी सोलापूर जिल्ह्यामध्ये विनंती बदली प्रक्रिया राबविण्यात आली होती.यामध्ये जि.प.प्रा.शाळा चांडोलेवाडी येथील पदवीधर शिक्षक दत्तात्रय मारुती काशीद व उपशिक्षक आनंदा शिवाजी जगताप हे अनुक्रमे तरंगेवाडी ता.सांगोला व लोणविरे ता.सांगोला येथे बदलून गेले. तसेच चांडोलेवाडी येथे पदवीधर शिक्षक प्रदीपकुमार पांडुरंग पाटील व उपशिक्षिका अरुणा प्रल्हाद तेली या बदलून आल्या.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजाराम मेटकरी व उपाध्यक्ष शिवाजी गुसाळे तसेच सदस्य हनुमंत कपडेकर, युवा नेते उमेशनाना चांडोले, समाधान चांडोले, दयानंद चांडोले, मोहन सरगर, मधुकर कपडेकर, श्री सावंत आदींनी बदली झालेल्या शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. व शाळेत हजर झालेल्यांचे स्वागत केले.याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक अंकुश गडदे, उपशिक्षिका नंदा शिंदे, लक्ष्मी पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय नवले सर यांनी केले
इयत्ता दुसरी तिसरी व सातवीतील विद्यार्थी आपले शिक्षक बदलून गेल्याने त्यांना गहिवरून आल्याचे जाणवले सर्व विद्यार्थ्यांना या शिक्षकांनी धीर दिला व पुढे शिक्षण घेऊन खूप मोठे व्हा असा आशीर्वाद दिला.