विज्ञानामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन व गणितामुळे गणितीय दृष्टिकोन निर्माण होतो: मा.प्राचार्य भीमाशंकर पैलवान

सांगोला प्रतिनिधी: सांगोला तालुका गणित अध्यापक मंडळ व विज्ञान अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सांगोला विद्यामंदिर प्रशालेत तालुक्यातील प्रत्येक प्रशालेतील गणित व विज्ञान विषयात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा व तालुक्यातील इन्स्पायर अवॉर्ड निवड विद्यार्थ्यांचा सत्कार समारोह कार्यक्रम आयोजित केला होता.

या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. प्रा. भीमाशंकर पैलवान, प्रमुख उपस्थिती श्री.अमोल गायकवाड सर (मुख्याध्यापक सांगोला विद्यामंदिर), प्रा. संजय शिंगाडे सर (उपमुख्याध्यापक न्यू इंग्लिश स्कूल सांगोला) व श्री लक्ष्मण जांगळे सर मा. प्राचार्य सांगोला विद्यामंदिर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. सी व्ही रमण व गणित तज्ञ रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली कार्यक्रमाचे सुरुवातीला प्रास्ताविक झाले

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0;
algolist: 0;
multi-frame: 1;
brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 44;

 

यामध्ये गणित अध्यापक मंडळाचे कार्याची माहिती व नियोजन तालुकाध्यक्ष श्री. शिवाजी चौगुले सर व विज्ञान मंडळाचे कार्य व वर्षभराचे नियोजन याची माहिती तालुकाध्यक्ष श्री. उत्तम बेहेरे सर यांनी सांगितली..दिवसाची सुरुवात गणितापासून होते व दैनंदिन जीवनात गणित कसे उपयोगाचे आहे याची माहिती सांगत सध्या सुरू असलेल्या अंधश्रद्धेवर विज्ञान कसे उपयुक्त आहे याची उदाहरणे सांगून शास्त्रज्ञांनी केलेले परिश्रम व विद्यार्थ्यांना करावयाचे परिश्रम या संदर्भात पैलवान सरांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.

यानंतर विद्यार्थ्यांनी गणित व विज्ञान विषयात प्रगती करून दोन्ही मंडळानी साथ साथ चालावे असे मत प्राचार्य गायकवाड सरांनी मांडले तर दहावीनंतर विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे कसे नियोजन करावे कोणत्या शाखा निवडाव्यात या संदर्भामध्ये मार्गदर्शन प्रा. शिंगाडे सर यांनी केले व गणित आणि विज्ञान मंडळी एकत्रितपणे काम करून असाच विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन द्यावे असे मत श्री जांगळे सर यांनी मांडले व व इन्स्पायर अवॉर्ड संदर्भात माहिती श्री भारत इंगोले सर यांनी सांगितली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री यतिराज सुरवसे,विज्ञान मंडळ सचिव श्री अतुल लुंगारे श्री प्रदीप बाबर,श्रीअमोल रणदिवे ,श्री सोमनाथ सपाटे , श्री दिलावर नदाफ,श्री निलकंठ लिंगे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विज्ञान जिल्हा उपाध्यक्ष श्री सुनिल लिगाडे सर यांनी केले व आभार गणित मंडळ सचिव श्री आनंद खंडागळे सर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button