काका डिजिटल फर्मचे धारेश्वर महास्वामीच्या हस्ते उद्घाटन संपन्न

सध्या डिजिटल चे युग असून, त्याचा प्रचार व प्रसार सर्वत्र वाढदिवस, निवडणुका, यश प्राप्ती यासाठी सुरू असून, काका डिजिटल अल्प दरात चांगले व आपले पाहिजे तसे काम करून देण्याने सर्वांची सोय होईल व या डिजिटल चे उद्घाटन झाले व यासाठी देव, देश, धर्मासाठी उपयोग होईल व याची जबाबदारी राहुल ओंकार यांनी घ्यावी असे डॉक्टर नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महास्वामीजी यांनी काका डिजिटल फर्माच्या उद्घाटन प्रसंगी सांगोला येथे आशीर्वाचनात सांगितले.
यावेळी विज्ञान महत्त्वाचे असून, तरुणांनी शेती व शिक्षणाकडे लक्ष द्यावे तसेच नामस्मरण, नाम चिंतन करणे गरजेचे आहे असेही गुरुवर्य धारेश्वर महास्वामी यांनी सांगितले. सुरुवातीस महास्वामींची पाद्यपूजा ओंकार चौगुले व राहुल पाटील या उभयंतांच्या हस्ते करण्यात आली तर महास्वामींचे स्वागत सुरेश काका चौगुले यांनी केले यावेळी शिक्षक नेते दादासो वाघमोडे यांनी डिजिटल ची माहिती प्रास्ताविकात सांगितली.
सदर प्रसंगी युवा नेते यश राजे साळुंखे पाटील, जि प सदस्य अतुल मालक पवार, सरपंच संजय सरगर, युवा नेते गुंडा दादा खटकाळे, विष्णुपंत केदार, संजय केदार, अरविंद भाऊ केदार, सुनील गायकवाड, सुनील चौगुले, अशोक पाटील, हरिभाऊ पाटील, प्रा. संजय देशमुख, मुकुंद पाटील, दत्ता पाटील, हनुमंत सरगर, राजू अडसूळ, राजू बंडगर, चंद्रकांत बंडगर, प्रा. विजय गोडसे, मदन रायचूरे, बसवेश्वर पाटणे, संतोष महिमकर, प्राचार्य सुभाष महिमकर, के वाय पाटील, रेड्डी सर, महादेव चौगुले, भाऊ पाटील, राजू अडसूळ, पत्रकार रविराज शेटे, रविराज स्वामी, लक्ष्मण ढोबळे, समाजभूषण गिरीश भाऊ नष्टे, चौगुले, पाटील परिवार, काका प्रेमी, नाझरे ग्रामस्थ उपस्थित होते.