पंढरपूर- सांगोला रोडवर झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू
पंढरपूर- सांगोला रोडवर झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असल्याची घटना काल ७ जुलै रोजी दुपारी २:५० वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की मुकुंद पाटील (वय:-५६ वर्षे) रा. कोल्हापूर हे पंढरपूरच्या दिशेने देवदर्शनासाठी कारने निघाले असता सांगोला-पंढरपूर रोडवर फॅबटेक कॉलेज जवळ पंढरपूरहुन सांगोला त्या दिशेने समोरून आलेल्या पिकअप जीप ने समोरासमोर जोराची धडक दिल्याने या अपघातामध्ये मुकुंद पाटील (वय-५६ वर्षे, रा.कोल्हापूर) यांचा उपचारापुर्वीच दुदैवी अंत झाला आहे. व इतर तिघेजण जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
या अपघाताच्या घटनेची फिर्याद सांगोला ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. साळे यांनी दिली असून याबाबत पुढील तपास सांगोला पोलीस करत असल्याची माहिती सांगोला पोलीस ठाण्याकडून मिळाली आहे.