उत्कर्ष विद्यालयात शाळाबाह्य स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा संपन्न….

मन मनगट व मेंदू यांचा विकास करील विद्यार्थ्यांना संस्कारक्षम बनवणाऱ्या उत्कर्ष विद्यालय मध्ये माननीय नंदकुमार प्रमोदजी व सरिता प्रमोदजी आणि माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थी, व मार्गदर्शक शिक्षक यांचा गुणगौरव सोहळा सोमवार दिनांक 8.7.2024 रोजी उत्कर्ष विद्यालयांमध्ये संपन्न झाला .त्यावेळेला व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्ष- मा.संजीवनी ताई केळकर ,उपाध्यक्ष- माधवीताई देशपांडे मॅडम, माजी- मुख्याध्यापिका भोसेकर मॅडम, नांगरे मॅडम ,खडतरे मॅडम व पर्यवेक्षक- भोसले सर उपस्थित होते .
वरील कार्यक्रमांमध्ये पाचवी स्कॉलरशिप ,आठवी स्कॉलरशिप, तसेच इतर बाह्य स्पर्धा व शैक्षणिक वर्ष 2023-2024 च्या वार्षिक परीक्षेमध्ये इ. पाचवी ते नववीतील प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा कौतुक समारंभ झाला .कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने झाली. प्रास्तविकेतून लिंगे मॅडम यांनी वर्षभरामध्ये घेण्यात आलेल्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी केलेले नियोजन ,विद्यार्थ्यांचे कष्ट, पालकांचे सहकार्य या सगळ्यांचा त्रिवेणी संगम झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले,असे सांगितले.
तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक- श्री.सुनील कुलकर्णी सर यांनी क्रिकेटमधील सूर्यकुमार यादव याने केलेल्या कर्तुत्वाचा दाखला विद्यार्थ्यांना देत कष्टाविना फळ नाही हा मोलाचा संदेश दिला व पालक शिक्षक यांचे कौतुक केले.
इ.पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत 11 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. त्याबद्दल त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा कौतुक सोहळा पालकांच्या वतीने करण्यात आला व त्याच वेळेला श्री. शिंदे सर यांनी आपले पालक मनोगत व्यक्त करत मुलांना व शाळेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .
वरील कार्यक्रमात वेदांगी शिंदे, प्रेम हागरे, ओम पडळकर व शार्दुल वसेकर या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकांविषयीची कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाची सांगता सपताळ मॅडम यांच्या आभार प्रदर्शनाने झाली. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.संचित राऊत सर यांनी केले होते.