पंढरपूर शहर व परिसरात देशी विदेशी मद्य विक्री, व ताडी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश
आषाढी एकादशी पंढरपूर यात्रा 2024 निमित्त पंढरपुर शहर व परिसरात सार्वजनिक शांतता राखणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमातील कलम 142 अन्वये खालील प्रमाणे मद्य विक्री व ताडी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दि. 15 जुलै 2024, ते दिनांक 19 जुलै 2024 रोजी पंढरपूर शहरातील व पंढरपूर शहरापासून 5 कि.मी. त्रिज्या परिसरातील सर्व देशी विदेशी मद्य विक्री व ताडी दुकाने पूर्ण दिवस बंद राहतील. दि. 20 जुलै 2024 व दिनांक 21 जुलै 2024 रोजी पंढरपूर शहरातील व पंढरपूर शहरापासून
5 कि.मी. त्रिज्या परिसरातील सर्व देशी व विदेशी मद्य विक्री, व ताडी दुकाने सायं. 5.00 वाजेपासून बंद राहतील.
तसेच आषाढी एकादशी पंढरपूर यात्रा 2024 निमित्त संत श्री तुकाराम महाराज व संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मुक्कामाच्या ठिकाणी (गावात/शहरात) सार्वजनिक शांतता राखणे आवश्यक असल्याने ,महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमातील कलम 142 अन्वये खालील प्रमाणे मद्य विक्री व ताडी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
गुरूवार दि. 11 जुलै 2024 रोजी नातेपुते पुर्ण दिवस बंद.
शुक्रवार दि.12 जुलै 2024 रोजी माळशिरस, अकलुज पुर्ण दिवस बंद
शनिवार दि.13 जुलै 2024 रोजी वेळापूर, बोरगांव ,श्रीपूर माळीनगर पुर्ण दिवस बंद
रविवार दि.14 जुलै 2024 रोजी भंडीशेगाव,पिराची कुरोली पूर्ण दिवस बंद.
सोमवार दि.15 जुलै 2024 रोजी वाखरी पूर्ण दिवस बंद
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशिर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत.