अखिल महाराष्ट्र सायकलवारी संमेलनात सायकलिस्ट विक्रमवीर नीलकंठ शिंदे सर यांचा सत्कार

पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त भव्य तिसरे सायकल रिंगण व महाराष्ट्र राज्य सायकलसंमेलन मनमाडकर मैदानावर उत्साहात पार पडले.

 

या दोन दिवसीय सायकल संमेलनात महाराष्ट्रातील 43 क्लब मधील 1800 सायकलपट्टूंनी सहभाग नोंदवला होता. यावेळी भारतातील नामवंत सायकलिस्ट कबीर राचुरे ,ह भ प शिवाजीराव मोरे, श्रीनिवास वायकर, उमेश परिचारक ,महाराष्ट्र नगर रचना विभागाच्या सहसंचालक प्रतिभा भदाने यांच्या हस्ते सांगोल्यातील विश्वविक्रमवीर नीलकंठ शिंदे सर यांचा सन्मानचिन्ह, विठ्ठल रुक्मिणी मूर्ती देऊन गौरवण्यात आले. नीलकंठ शिंदे सर यांनी बांगलादेश, नेपाळ व या विदेशी सायकल यात्रा यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल विशेष सन्मानाने गौरवण्यात आले. सदर सायकल यात्रेमुळे त्यांनी भारत व इतर देशांविषयी शांतता ,समता ,एकता बंधुतेचा जागर केल्याने या देशांचे संबंध दृढ होण्यास आणखी मदत होणार असल्याची प्रमुख मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

अखिल महाराष्ट्राची आषाढी पंढरपूर सायकल वारी सोहळा अतिशय सुंदर व नयनरम्य वातावरणात पार पडला…. महाराष्ट्रातील सर्वच सायकल क्लबनी बॅकअप टीम, व आयोजक यांचे सुंदर व शिस्तबद्ध नियोजनाबद्दल मनापासून आभार केले.भक्ती -शक्तीच्या वातावरणात लहानांपासून जेष्ठांपर्यंत सर्वांनाच एक वेगळीच उर्जा मिळत 75 कि.मी. सायकल प्रवास पूर्ण झाला .अनोखे स्वागत, नगरप्रदक्षिणा,सायकल रिंगण,सायकल संमेलन विठुरायाच्या गजरात उत्साहवर्धक वातावरणात पार पडले..अशा नयनरम्य सायकल सोहळ्याचे सर्वजण साक्षीदार झाल्याचा अभिमान व आनंद वाटला..नक्कीच प्रत्येक सायकल वारकरी एकमेकांशी ओळखी जोडत पुढील आखिल महाराष्ट्राची पंढरपूर सायकल वारी २०२५ ची आतुरता घेऊनच परतला.

 

पंढरपूर येथील सायकल संमेलनात निळकंठ शिंदे सर यांचा गौरव करून सन्मानित केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक , अभिनंदन होत आहे .यावेळी सांगोला सायकलर्स क्लबचे बाळासाहेब टापरे सर, प्रकाश खडतरे, अनिल मदने सर, माधवराव शिंदे सर, शेखर गाटे यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button