जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी कार्यालयांनी त्रैमासिक विवरणपत्र ई.आर-1 ऑनलाईन 31 जुलै पर्यंत सादर करावे.
महाराष्ट्र शासनाच्या ध्येय धोरणानुसार ,सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे अधिसूचीत करणेची सक्ती करणारा) कायदा 1959 व त्याखालील नियमावली 1960 मधील कलम 5(1) (शासकीय आस्थापनांसाठी), 5(2)(खाजगी आस्थापनांसाठी) नुसार, सोलापूर जिल्ह्यातील सार्वजनिक/खाजगी क्षेत्रातील आस्थापनांनी त्यांचेकडे काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती पुरुष/स्त्री/एकूण (त्रैमासिक विवरणपत्र ई.आर-1) स्थानिक सेवायोजन कार्यालयास ऑनलाईन सादर करणे कायद्याने बंधनकारक आहे.
या सेवायोजन क्षेत्र माहितीचा उपयोग हा योजनाबध्द आर्थिक विकासात निरनिराळे प्रकल्प तयार करण्यासाठी व त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी, आवश्यक मनुष्यबळाचा अंदाज घेण्यासाठी होत असतो. अशा प्रकारची प्राप्त होणारी सांख्यिकी माहिती महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालय, नवी दिल्ली यांचे कडे दर तिमाहीस पाठविली जाते.
तरी सदर विविरणपत्र(ई-आर 1) 31 जुलै पर्यंत ऑनलाईन खाली दिलेल्या वेबपोर्टलवर सादर करणे आवश्यक आहे. या वेबपोर्टलवर त्रैमासिक विवरणपत्र ई.आर-1 हे प्रत्येक तिमाही संपल्यानंतर ऑनलाईन सादर करण्यासाठी प्रत्येक आस्थापनेचा युजर आयडी व पासवर्ड हे यापूर्वीच दिलेले आहेत त्याचा वापर करून भरण्यात यावा.
वेबसाईट -https://roigar.mahaswayam.gov.in
यासंदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थकोट, पार्कचौक, सोलापुर (0217-2950956) या कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन सहायक आयुक्त कौशल्य विकास ,रोजगार व उद्योजकता सोलापूर श्री नलावडे यांनी केले आहे.