मिरज येथे दिव्यांगासाठी मोफत संगणकीय व व्यावसायिक प्रशिक्षण

महाराष्ट्र शासन, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा परिषद, सांगली अंतर्गत कार्यरत शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह ही संस्था प्रौढ दिव्यांगासाठी मोफत प्रशिक्षण देणारी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव शासकीय संस्था आहे. या संस्थेतील प्रशिक्षण वर्गाना महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ, मुंबई ची शासन मान्यता आहे. ही संस्था अखिल भारतीय स्तरावरील फिक्की( FICCI) पुरस्कार (1999) प्राप्त असून सन 2024-25 या चालू शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश देणे सुरु आहे. प्रवेशासाठी नियम अटी व सवलती पुढील प्रमाणे आहेत.

सर्टिफिकेट इन कॉम्यूटर ऑपरेशन वुईथ एम. एस. ऑफिस (संगणक कोर्स)- किमान इ. 8 वी पास
मोटार अॅन्ड आर्मेचर वायडींग, सबमर्सिबल पंप सिंगल फेज, (इलेक्ट्रीक कोर्स)- किमान इ. 9 वी पास
वयोमर्यादा : 16 ते 40 वर्ष ,प्रशिक्षण कालावधी: 1 वर्ष, फक्त दिव्यांग मुलांनाच प्रवेश दिला जातो.

सोई व सवलती – प्रशिक्षण कालावधीत राहण्याची, जेवणाची व प्रशिक्षणाची मोफत सोय, अद्यावत व परीपूर्ण संगणक कार्यशाळा, भरपूर प्रॅक्टीकल्स व व्यवसायाभिमुख मोफत प्रशिक्षण, नेटवर्कीग व इंटरनेटची सुविधा, अनुभवी व तज्ञ निदेशक, उज्वल यशाची परंपरा, समाज कल्याण विभागाकडून स्वयंराजगारासाठी व्यवसायासाठी बीज भांडवल योजना.

प्रवेश अर्ज व माहितीपत्रक अधिक्षक, शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, टाकळी रोड, म्हेत्रे मळा, गोदड मळ्याजवळ, मिरज ता. मिरज जि. सांगली पिनकोड: 416 410 नंबर 0233-2222908 मोबाईल 9922577561,9595667936 या पत्यावर पोस्टा व्दारे किवा समक्ष मोफत मिळतील. प्रवेशासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. प्रवेश अर्ज पूर्णपणे भरुन फोटोसह संस्थेकडे पाठवावेत किंवा समक्ष भरुन द्यावत प्रवेश अर्जासाबत शाळा सोडल्याचा दाखला, इयत्ता 10 वी चे मार्कशिट व प्रमाणपत्र अपंगत्व असल्याबाबतचे सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, UDID कार्ड, Domicile प्रमाणपत्र व उत्पन्नाचा दाखला यांच्या डोरॉक्स प्रती जोडाव्यात. प्रवेश अर्ज संस्थेकडे पाठवावेत.

प्रवेश अर्ज प्राप्त झाल्यानंतर तज्ञ समिती व्दारे मुलाखती घेऊन प्रवेश देण्यात येईल.
तरी गरजू दिव्यांगानी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी त्वरीत संपर्क साधावा तसेच ग्रामीण व शहरी भागातील लोकांना आवाहन करणेत येते की या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपणांस ज्ञात असलेल्या गरजू दिव्यांग बांधवाना या शासकीय योजनेची माहिती करून द्यावी असे आवाहन अधिक्षक शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह,मिरज यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button