पारंपारीक वस्त्रोद्योग बक्षिस योजनेसाठी हातमाग विणकरांनी 19 जुलै पर्यंत अर्ज करावेत
राज्याच्या वस्त्रोद्योगाच्या वाढीस चालना देण्यासाठी व वस्त्रोद्योगाला आवश्यक त्या उपाययोजनांना हातभार लावण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय दिनांक 10 नोव्हेंबर 2023 नुसार पुढील 5 वर्षाच्या कालावधीसाठी एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग, धोरण 2023-28 असे असून, सन 2023-24 करीता या “पारंपारीक वस्त्रोद्योग विणकरांना बक्षीस योजना” अंतर्गत विणकरांना बक्षिस देण्यात येणार आहे. या योजनेतर्गत विजेत्या स्पर्धकांचे राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त सत्कार करण्यात येणार आहेत.
शासन निर्णयात राज्यातील पारंपारीक वस्रोद्योग विणरांचा सन्मान करण्यासाठी आणि सामाजिक व आर्थिक या क्षेत्राच्या योगदानावर प्रकाश टाकण्यासाठी, पारंपारीक वस्त्रोद्योग विणकारांना ही बक्षीस योजना देण्यात येत आहे.
सदर योजनेअंतर्गत पाच पारंपारिक पैठणी साडी , हिमरु शाल , करवत काटी साडी, घोंगडी , खण फॅब्रिक ह्या वस्रोद्योग क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट डिझाईन्सचा राष्ट्रीय हातमाग दिननिमित सत्कार करण्यात येणार असून पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाला अनुक्रमे रु. 20 हजार , रु. 15 हजार आणि रु. 10 हजार बक्षिस देण्यात येणार आहे. सदर बक्षिसाची रक्कम पारंपारीक वस्रोद्योग विणकरांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी प्रणालीद्वारे अदा करण्यात येणार आहे.
या योजनेचे निकष खालील प्रमाणे राहतील
पारंपरिक वस्त्राचे विणकाम करणारे सर्व विणकर, खाजगी/सहकारी संस्था/ महामंडळ/महासंघाचे/स्वयंसेवी संस्था/गट या स्पर्धेत भाग घेवू शकतील. अर्जासोबत विणकाम करतानाचा विणकराचा जिओ टॅगींग फोटो सादर करणे गरजेचे राहील.आणि तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
तरी या पारंपारीक वस्त्रोद्योग बक्षिस योजने अंतर्गतचे हातमाग विणकरांना त्यांचेकडील उत्कृष्ट वाण उपआयुक्त वस्त्रोद्योग, सोलापूर कार्यालय पत्ता महसूल कर्मचारी सहकारी संस्था इमारत, जुने जिल्हाधिकारी, सोलापूर आवार, सोलापूर येथे दि. 19 जुलै 2024 पर्यंत सायंकाळी 05.30 वाजेपर्यंत सादर करण्यात यावेत. तसेच या विभागतील जास्तीत जास्त विणकर, खाजगी/सहकारी संस्था/ महामंडळ/महासंघाचे/स्वयंसेवी संस्था/गट यांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन वस्त्रोद्योगचे प्रादेशिक उपायुक्त चंद्रकांत टिकुळे यांनी केले आहे.