तालुकास्तरीय अबॅकस स्पर्धेत सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिकल स्कूलचे सुयश.

रविवार दि. 27/8/2023रोजी राजगुरू अबॅकस ॲकॅडमी मोहोळ जि. सोलापूर येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय अबॅकस स्पर्धेत सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले. यामध्ये 6 ते 7 वयोगटात विद्यालयाचा इ.पहिलीचा विद्यार्थी कु. अदिराज अनिल कोळसे-पाटील याने ‘z’लेवलमध्ये तिसरा क्रमांक मिळवला तसेच इ. तिसरीमधील कु. विराज प्रशांत जाधव या विद्यार्थ्यांने ए लेवल अबॅकस स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवला
या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले तसेच विद्यालयातील श्रीशा यशवंत दिघे, जयेश धनंजय जाधव, सत्यम महेश कुराडे,आरव दिपक लांडगे, श्रुती श्रीरंग माळी, युगंधरा विश्वजित देशमुख व निल सुप्रिया अमोल पाटील, रणजित हेमंत नलवडे या विद्यार्थ्यांनाही प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले.
या विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या सहशिक्षिका कु. दिपाली बसवदे यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुध्दचंद्र झपके,सचिव श्री.म.शं.घोंगडे, सहसचिव श्री.प्रशुध्दचंद्र झपके साहेब, खजिनदार श्री. शं. बा. सावंत, कार्यकारिणी सदस्य श्री. विश्वेश झपके,सर्व संस्था सदस्य तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु. सरिता कापसे मॅडम यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.