सांगोला रोटरी क्लबचे चार्टर अध्यक्ष रो.सी.ए. के.एस.माळी व रो.रत्नप्रभा माळी यांचा विशेष सन्मान.
सांगोला(प्रतिनिधी):- सांगोला रोटरी क्लब चे चार्टर अध्यक्ष रो.सी.ए. के.एस.माळी यांनी रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 साठी झाकली मूठ सव्वा लाखाचीया आवाहानाला प्रतिसाद देत रोटरीच्या टीआरएफसाठी भरघोस योगदान दिले त्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
सांगोला रोटरी क्लब च्या 07.07.24 रविवार रोजी झालेल्या पदग्रहणा दिवशी हा विशेष सन्मान प्रमुख पाहुणे माजी प्रांतपाल रो. एड. इस्माईल पटेल व असिस्टंट गव्हर्नर रो. विश्वास आराध्य यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी त्यांना पॉल हॅरिस फेलो ची सन्मान पिन प्रदान करण्यात आली.
सांगोला रोटरी क्लबच्या सदस्या रो.सौ.रत्नप्रभा माळी यांना आदर्श योग गुरु पुरस्कार मिळाल्या बद्दल दि.07.07.24 रविवार रोजी प्रमुख पाहुणे माजी प्रांतपाल रो. एड. इस्माईल पटेल व असिस्टंट गव्हर्नर रो. विश्वास आराध्ये यांच्या हस्ते सन्मान करण्यातआला. यावेळी रोटरी क्लबचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.