गुणवत्तेबरोबरच संस्कारक्षम विद्यार्थी घडवणे हेच आमचे ध्येय- प्रा. प्रबुद्धचंद्र झपके
नाझरा विद्यामंदिर मध्ये दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

नाझरा(वार्ताहर):- विद्यामंदिर परिवारात घडणारा प्रत्येक विद्यार्थी गुणवंत तर झालाच पाहिजे त्या सोबतच तो विद्यार्थी संस्कारक्षम ही झाला पाहिजे अशा पद्धतीने विद्यामंदिर परिवारातील प्रत्येक शिक्षक काम करत असतो.सध्या सोलापूर जिल्ह्यात विद्यामंदिर हा ब्रँड ठरत आहे.निश्चितपणे असंख्य माजी विद्यार्थी समाजाच्या विविध स्तरावर अतिशय कुशलतेने काम करताना दिसत आहेत.गुणवत्तेबरोबरच संस्कारक्षम विद्यार्थी घडवणे हेच सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे ध्येय आहे असे प्रतिपादन संस्थाअध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांनी केले.नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर प्राचार्य बिभीषण माने,सांगोला विद्यामंदिरचे प्राचार्य अमोल गायकवाड,कोळा विद्यामंदिरचे प्राचार्य श्रीकांत लांडगे,पर्यवेक्षक मधुकर धायगुडे,नाझरा विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका मंगल पाटील आदी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेचे पूजन गुणवंत विद्यार्थिनी व पालकांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थिततांचे स्वागत प्राचार्य बिभीषण माने यांनी केले.
यावेळी ऋतुजा दिगंबर शिंगाडे,आरती सचिन बनसोडे,प्रवीण विठ्ठल बनसोडे, संजीवा गजानन मोहिते,स्नेहल तुकाराम मिसाळ,प्रांजली रावसाहेब भोसले,साईश्री आशिष सोनवणे,रोहन रमेश खंडागळे,अनुष्का नवनाथ डोंगरे,आदित्य देविदास सरगर,सृष्टी संजय बुलबुले,गिरीश गणेश दिघे, अश्विनी चंद्रकांत बाबर या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसमवेत सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विद्यार्थिनी अश्विनी बाबर व पालक दिगंबर शिंगाडे यांनी शाळेतील गुणवत्तेबद्दल व शिस्तीबद्दल समाधान व्यक्त करत प्रशालेच्या यशाबद्दल कौतुक केले.या कार्यक्रमाचे आभार पर्यवेक्षक मधुकर धायगुडे यांनी मांडले तर सूत्रसंचालन सुनील जवंजाळ यांनी केले.
सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने 95% च्या पुढील गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास रोख रुपये 1000 चे पारितोषिक देण्यात आले यावर्षीचे पारितोषक ऋतुजा दिगंबर शिंगाडे या विद्यार्थिनीने पटकावले स्मृतीचिन्ह रोख रुपये एक हजार देऊन संस्थाअध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. दहावीला शिकवणाऱ्या सर्व विषय शिक्षकांचाही सन्मान मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.