गुरुवर्य झिरपे यानी वाचन संस्कृती वृद्धींगत केली- डॉ.कृष्णा इंगोले; चैतन्य हास्य क्लब तर्फे अभिष्टचिंतन
सांगोला- गुरुवर्य महादेव झिरपे यानी सांगोला विद्यामंदिरचे प्राचार्य व सांगोला महाविद्यालयात सचिव म्हणून काम करत असताना ग्रंथालये समृद्ध केली असुन वाचन संस्कृती वृद्धींगत करण्याचे फार मोठे काम केले आहे, असे गौरवोद्गार डॉ.कृष्णा इंगोले यांनी काढले.
चैतन्य हास्य क्लबचे उपाध्यक्ष महादेव झिरपे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यात डॉ. इंगोले बोलत होते.
यावेळी सचिव भागवत पैलवान यांच्या हस्ते झिरपे यांचा सत्कार करण्यात आला. गुरुवर्य झिरपे यांचा विद्यार्थी म्हणून, सहकारी म्हणून काम करताना बर्याच गोष्टी शिकता आल्या व माझे व्यक्तिमत्व घडत गेले असे मत व्यक्त करुन प्रा.राजाभाऊ ठोंबरे यानी गुरुवंदन केले.यावेळी मल्लिकर्जुन घोंगडे, भागवत पैलवान, सुधीर दौंडे यानी मनोगत व्यक्त केले.
चैतन्य हास्य क्लबच्या सत्कारामुळे मी भारावलो असुन ऊर्जा प्राप्त झाली आहे,असे मत झिरपे यानी सत्कारला उत्तर देताना व्यक्त केले.अध्यक्ष जगताप यानी प्रास्ताविकात झिरपे व त्यांच्या मैत्रीवर प्रकाश टाकला. भाऊसाहेब पवार यानी आभार प्रदर्शन केले.
सदर कार्यक्रमास ह भ प बाळासाहेब तेली, हेमंत तेली, जयंत तेली, प्रकाश होनराव, अशोक केदार, अशोक जाधव, चंद्रकांत जाधव, सुभाष महिमकर, अरविंद डोंबे, उत्तम पाटोळे, विश्वेश्वर कोठावळे, प्रशांत शेंडगे, बाळासाहेब मेटकरी, सुधाकर म्हेत्रे आदि उपस्थित होते.