महाराष्ट्र

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुंजकरवस्ती शाळेमध्ये ‘शब्द गुढी’ उभारून गुढीपाडव्याचे व नवगताचे स्वागत

गुढीपाडवा हा भारतीय नववर्षाचा शुभप्रसंग असल्याने शाळेमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा “गुढीपाडवा पट वाढवा” उपक्रमाच्या अंतर्गत शाळेमध्ये ‘शब्द गुढी’ उभारून नवागतांचे स्वागत करण्यात आले.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सकारात्मक आणि अर्थपूर्ण शब्द तसेच त्यांची चित्रे वापरून एक आकर्षक गुढी तयार केली. शिक्षण, संस्कृती, नवा संकल्प, प्रगती, आनंद, नैतिकता, परंपरा यांसारखे शब्द वापरून गुढीला विशेष स्वरूप देण्यात आले. विद्यार्थ्यांना शब्दांचे आणि गुढीपाडव्याच्या परंपरेचे महत्त्व समजावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला गुढीपाडव्याचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. त्यानंतर शाळेतील पहिले पाऊल म्हणून नवागतांचे चे औक्षण करून आणि फुले देऊन स्वागत करण्यात आले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वागत मोठ्या उत्साह पूर्वक झाले .
या उपक्रमाचे आयोजन शाळेतील शिक्षिका श्रीमती. स्मिता शिंदे/गायकवाड  व श्रीमती .सारिका गवसने यांनी केले. त्यांचे विशेष मार्गदर्शन लाभल्यामुळे विद्यार्थ्यांनी आनंदाने सहभाग घेतला. शाळेतील शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांनी या संकल्पनेचे मनःपूर्वक कौतुक केले.सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button