गरजू महिलेस आपुलकीकडून शिलाई मशीन भेट

सांगोला ( प्रतिनिधी )- मेथवडे ता. सांगोला येथील एका गरजू महिलेला आपुलकी प्रतिष्ठानकडून शिलाई मशीन भेट देण्यात आली.
सांगोला तालुक्यात सामाजिक कार्यात अग्रणी असलेल्या आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने नेहमीच गरजू व्यक्तींना मदत करण्यात येते. सांगोला तालुक्यातील मेथवडे येथील अशाच एक गरजू महिला भगिनी मंगलताई सुर्वे यांना आपुलकी सदस्य माजी प्राचार्य बाळासाहेब वाघमारे यांच्याकडून देणगीदाखल मिळालेली शिलाई मशीन आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने भेट देण्यात आली.
त्याचबरोबर इयत्ता बारावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या त्यांच्या मुलीला शैक्षणिक साहित्यही देण्यात आले. यावेळी आपुलकी प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.