फॅबटेक पब्लिक स्कूलचा स्टुडंट्स कौन्सिलचा पदग्रहण व शपथविधी समारोह संपन्न

फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये स्टुडंट्स कौन्सिलचा पदग्रहण व शपथविधी समारोह संपन्न झाला.
शालेय शिस्त टिकवण्यासाठी व शाळेतील गुणवत्ता वाढवण्यासाठी राष्ट्राच्या सक्षमीकरणासाठी तसेच पर्यावरणाच्या संरक्षणासाठी शालेय जीवनात नेतृत्व गुण आणि जबाबदारीची जाणीव व्हावी म्हणून फॅबटेक पब्लिक स्कूल मध्ये शैक्षणिक वर्ष 2024-25 चा स्टुडंट्स कौन्सिलचा पदग्रहण व शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी सांगोला पोलीस स्टेशनचे असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर श्री.आदिनाथ खरात डॉ. नामदेव भोसले माजी केंद्रप्रमुख पंचायत समिती सांगोला स्कूलचे प्राचार्य श्री सिकंदर पाटील, पालक प्रतिनिधी श्री अश्विन कांबळे , सौ मयुरी कांबळे सौ रुपाली पवार, ए.ओ वर्षा कोळेकर, सुपरवायझर वनिता बाबर हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. स्कूलचे नवनिर्वाचित ,हेडबॉय कु.ओंकार जानकर, हेडगलॆ कु अन्वी कांबळे यांना पाहुण्यांनी बॅज लावले.
यानंतर येलो हाऊस कॅप्टन कु.माधुरी यमगर, व्हाईस कॅप्टन कु.तनिष्क ढोले, रेड हाऊस कॅप्टन कु. प्रशांत इंगोले व्हाईस कॅप्टन कु. मयुरेश राऊत ,ग्रीन हाऊस कॅप्टन कु. आदर्श शिंदे व्हाईस कॅप्टन साईराज जानकर ब्ल्यू हाऊस कॅप्टन अजय पवार व्हाईस कॅप्टन कु.समर्थ रोंगे यांनी पाहुण्यांसमोर हाऊसचे प्रतिनिधित्व करत परेड सादर केली यानंतर कॅप्टन व व्हाईस कॅप्टनला पाहुण्यांच्या हस्ते बॅज लावण्यात आले.
सुपरवायझर वनिता बाबर यांनी विद्यार्थ्यांना शपथ दिली ,असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर श्री आदिनाथ खरात यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम व  राष्ट्रीय कर्तव्य सांगितले, केंद्रप्रमुख डॉ .नामदेव भोसले यांनी विद्यार्थ्यांना स्कूलचे प्रतिनिधित्व करत असताना विद्यार्थ्यांचे हक्क व विद्यार्थ्यांच्या समस्यांची निराकरण कसे करावे हे सांगितले. स्टुडंट्स कौन्सिल विद्यार्थ्यांना स्कूलचे क्रीडाशिक्षक पंचाक्षरी स्वामी यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रुपनर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री.दिनेश रुपनर कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे प्राचार्य सिकंदर पाटील यांनी स्टुडंट्स    कौन्सिल विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  मृणाल राऊत यांनी केले व आभार  फरीदा मुलाणी यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button