श्री.विकास भोसले याचा सत्कार संपन्न

डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला चां खो खो खेळाडू श्री. विकास भोसले याची नुकत्याच अहमदनगर येथे झालेल्या पोलीस भरती मध्ये उत्कृष्ट कामगिरी करून तो पोलीस भरती झाला.
श्री विकास भोसले हा चिंचोली गावचा रहिवासी असून डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला येथून गणित विषयातून पदवी संपादन केलेली असून तो उत्कृष्ट खो-खो पटू म्हणून त्याचे नाव सर्व दूर झालेले आहे अभ्यासा बरोबर खेळाची आवड असल्यामुळे तो पोलिस भरती झालेला आहे.
श्री विकास भोसले यांच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सिकंदर मुलांनी सर संस्थेचे सचिव श्री विठ्ठलराव शिंदे सर यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला या सत्कार प्रसंगी शारीरिक शिक्षण संचालक प्रा. विजय पवार प्रा.बी. डी.कोकरे प्रा.हणमंत कोळवले प्रा.डॉ.अशोक वाकडे कार्यालय अधीक्षक श्री. शामराव ठोंबरे सर , स्वप्निल शिंदे सर, श्री. सुनील तंडे सर , श्री. तानाजी गुळीक सर, श्री. आबासाहेब गावडे सर श्री.नवनाथ कांबळे सर श्री.विलास खुळे आदी मान्यवर उपस्थित होते