महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या वतीने पोलीस निरीक्षक भिमराव खणदाळे यांना निवेदन

सांगोला(प्रतिनिधी):-महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या वतीने सोलापूर जिल्हा महिला अध्यक्ष ऍडव्होकेट सौ. सुप्रिया शिरदाळे (कोठावळे) यांनी सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे यांना निवेदन दिले.
1 जुलै 2024 रोजी घडलेल्या घटनेचा म्हणजे सावकाराने व्याजापोटी लावलेल्या तगाद्याला तसेच शिवीगाळला कंटाळून 25 वर्षे युवकाने मिरज-पंढरपूर रेल्वे ट्रॅक वर केलेल्या आत्महत्याच्या घटनेचा निषेध केला तसेच अशा घटनांना आळा घालण्यासाठी बेकायदेशीर वसुली करणार्या अशा सावकारांवर कारवाई होणे काळानुरूप गरजेचे झाले आहे आणि सावकारांवर कारवाई झाली तरच सर्वसामान्य जनतेचा कायद्यावरचा विश्वास दृढ होईल हे नमूद करण्यात आले आहे
तसेच वरिष्ठ अधिकारात प्रस्तुत घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसे न झाल्यास ही बाब लोकशाही मार्गाने घटनात्मक अधिकारात आंदोलनाची भूमिका घेऊन शासनाच्या समाजाच्या व प्रशासनाच्या पटलावर आणणे गरजेचे होईल व अशा प्रसंगी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची जबाबदारी पोलीस अधिकार्यांची राहील असे निवेदनात नमूद करण्यात आले.