नौदलातून सेवानिवृत्त जवांनासाठी परिसंवाद मेळावा
सोलापूर जिल्हयातील नौदलातून (Navy) सेवानिवृत्त झालेले सैनिक व त्यांच्या विधवांना कळविण्यात येते की, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांचे अधिपत्याखालील सैनिकी मुलांचे वसतीगृह, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या पाठीमागे, विजापूर रोड, सोलापूर येथे दिनांक 13 जुलै 2024 रोजी सकाळी 09 वा. नौदलातील 12 अधिकारी व 4 सैनिकांची कार रॅली येणार आहे.
हे अधिकारी सोलापूर जिल्हयातील नौदलातून सेवानिवृत्त झालेल्या सैनिकांना व त्यांच्या विधवा यांचे सोबत संवाद साधणार आहेत. तरी या परिसंवाद मेळाव्यासाठी जिल्हयातील नौदलातून (Navy) सेवानिवृत्त झालेले सैनिक व त्यांच्या विधवांनी मोठ्या संख्येने वरील ठिकाणी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त ले. कर्नल शरद प्रकाश पांढरे यांनी केले आहे.