agriculturemaharashtrasolapur

एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम सन 2024-25 प्राथमिक प्रक्रीया केंद्र घटकास अनुदान

HTML img Tag Simply Easy Learning    

एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम या योजनेसाठी काढणीपश्चात व्यवस्थापन घटकांतर्गत जिल्हयास प्राथमिक प्रक्रिया केंद्र या घटकास अनुदान मंजुर झालेले असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

*घटकाची माहिती खालील प्रमाणे
प्रकल्पाचे तांत्रिक निकष पुढील प्रमाणे
प्रकल्पाचा मशिनरी हा महत्त्वाचा भाग असल्याने त्यावर कमीतकमी 60 टक्के खर्च करणे बंधनकारक राहील व प्रकल्पाचे बांधकाम हे गरजेपुरतेच असल्याने त्यावर जास्तीतजास्त 40 टक्के खर्च गृहित धरण्यात यावा. बांधकाम खर्चामध्ये प्रकल्पाच्या इमारत बांधकाम, विद्युत सुविधा उभारणी, वाळवणी आवार, साठवण गृह इ. सर्व घटकांचा समावेश राहील.

 

अर्थसहाय्याचे स्वरुप :-सर्वसाधारण क्षेत्रासाठी ग्राहय भांडवली प्रकल्प खर्चाच्या 40 टक्के रक्कम रू. 10.00 लाख आणि डोंगराळ व अधिसूचित क्षेत्रासाठी रक्क्म रू. 13.75 लाख ग्राहय भांडवली प्रकल्प खर्चाच्या 55 टक्के अर्थसहाय्य देय आहे. प्राथमिक प्रक्रिया केंद्र हा घटक स्वतंत्रपणे राबविण्यासाठी स्वतंत्ररित्या सदर घटकाच्या मार्गदर्शक सुचना दिलेल्या आहेत.
त्यानुसार लाभार्थी निवडीचे निकष असे असतील,  शेतकरी, शेतकरी उत्पादक गट, भागीदारी संस्था, मालकी संस्था, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता गट, नोंदणीकृत उत्पादक संघ (ज्यामध्ये कमीतकमी 25 सदस्य असतील), शेतकरी उत्पादक कंपनी,  वैयक्तिक शेतकरी, भागीदारी संस्था, मालकी संस्था, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता गट (ज्यामध्ये किमान 15 सदस्य असतील), शेतकरी उत्पादक कंपनी, कंपनी, शेतकरी गट यांचेसाठी अर्थसहाय्य हे बैंक कांशी निगडीत असून (Credit Linked Back Ended Subsidy) बैंक कर्जाच्या परताव्याच्या स्वरुपात अनुदान देय राहील.

तरी जिल्हयातील सर्वसाधारण, अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती व इतर सर्व प्रवर्गातील शेतक- यांना आवाहन करण्यात येते की, वरील प्रमाणे घटकासाठी अधिकाधिक शेतक-यांनी महा-डीबीटी पोर्टल https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी संबधीत नजीकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डी.एस. गावसाने यांनी केले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!