sangolamaharashtra

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया निशुल्क  

योजनेचा लाभ मिळवण्यासाठी  मोबाईल क्रमांक व आधार कार्ड  बँक खात्याशी लिंक असणे  आवश्यक :: मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी* 

HTML img Tag Simply Easy Learning    
राज्यातील  महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये  सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी  सध्या महाराष्ट्र शासनाची ” मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेची सुरवात करण्यात आलेली आहे. सांगोला शहरात  या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्या अंतर्गत आज नगरपरिषद कार्यालयात योजनेचे प्रशिक्षण शिबिर पार पडले.
     सदर  कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगर परिषदेच्या नोडल अधिकारी  तृप्ती रसाळ यांनी केले. या योजनेसाठी राज्यातील 21 ते 65 या वयोगटातील    विवाहित, विधवा,  घटस्फोटीत परीत्यक्त्या,  निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक  अविवाहित महिला  पात्र आहेत.अर्ज भरण्यासाठी पात्र महिला आपल्या भागातील जवळच्या अंगणवाडी या ठिकाणी किंवा नगर नगरपरिषद कार्यालयात जाऊ शकतात. या प्रशिक्षण शिबिरात योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आवश्यक सूचना महिला व बालकल्याण अधिकारी वर्षा पाटील यांनी केले. ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी नारीशक्ती दूत या अँपचा वापर करायचा आहे. अर्जदाराची  संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अँपवरती अपलोड करायची आहेत.
 *आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे*1)आधार कार्ड, 2अधिवास प्रमाणपत्र/ जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला  यापैकी एक प्रमाणपत्र, (टीप : अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे 15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड / मतदान ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला  यापैकी एक प्रमाणपत्र ).3) महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास  पतीचा जन्म दाखला / शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / अधिवास प्रमाणपत्र 4) उत्पन्न प्रमाणपत्र (रु. 2.50 लाखांपर्यंत)/ पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड यापैकी एक 5) अर्जदाराचे हमीपत्र 6) बँक पासबुक( आधार लिंक असलेले)7) अर्जदाराचा  फोटो ( स्वतः लाभार्थी महिला  उपस्थित असणे आवश्यक )
     अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया निशुल्क असून  योजनेचा लाभ मिळवण्यासाठी  लाभार्थ्या चा मोबाईल क्रमांक  आधार कार्ड तसेच  बँक खात्याशी लिंक असणे  आवश्यक आहे,याची माहिती  उपस्थितांना मार्गदर्शन करताना  मुख्याधिकारी सुधीर गवळी यांनी दिली.तसेच ज्या महिलांचे  स्वतंत्र बँक खाते नाही त्यांनी स्वतःचे पोस्टामध्ये नवीन बँक खाते उघडावे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना लाभार्थी अन्य कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेत नाही,  याचे हमीपत्र देणे बंधनकारक आहे.शाळा सोडल्याचा दाखला  आणि आधार कार्ड या दोन्ही कागदपत्रांवरील  जन्माची तारीख एकच असणे आवश्यक आहे. ज्या लाभार्थ्यांच्या  कागदपत्रांमध्ये अशा प्रकारची तफावत आहे  त्यांनी आधार कार्ड  व इतर कागदपत्रे दुरुस्त करून फॉर्म भरायचा आहे. तरी सर्व पात्र लाभार्थ्यांनी जवळची अंगणवाडी किंवा नगरपरिषद कार्यालयात जाऊन  योजनेचा फॉर्म भरावा, असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी  डॉ. सुधीर गवळी  यांनी केले आहे.
HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!