सह्याद्री फार्मसी कॉलेजमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० या विषयावरील परिसंवाद संपन्न

भारतीय फार्मसी क्षेत्राचे जनक प्रा.महादेव लाल श्रॉफ यांच्या १२२ व्या जयंती निमित्त राष्ट्रीय फार्मसी एजुकेशन डे अंतर्गत पी.सी.आय नवी दिल्ली यांनी फार्मा अन्वेषण-२०२४ साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
या दिनाच्या निमित्ताने सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी,मेथवडे या महाविद्यालयात “इंडस्ट्री-अकॅडेमिया पार्टनरशिप फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ नॅशनल एडुकेशनल पॉलीसी” या विषयावर डॉ.ए.यु.चोपडे डीन,फ्याकल्टी ऑफ सायन्स,के.बी.पी.एम कॉलेज,पंढरपूर यांचे एक दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.या परिसंवादाचे उदघाटन प्रमुख पाहुणे डॉ.ए.यु.चोपडे,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.दिलीपकुमार इंगवले,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील यांच्या हस्ते व सर्व प्राध्यापक,विद्यार्थी,पालक यांच्या उपस्थितीत सरस्वतीमातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून झाले.
प्रमुख पाहुणे डॉ.ए.यु.चोपडे यांनी आपल्या मनोगतात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० विषयी संपूर्ण माहिती सांगितली.राष्ट्रसमोर असणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मनुष्यबळ हे सर्वात महत्त्वपूर्ण संसाधन आहे. याचाच अर्थ जर राष्ट्रातील नागरिक सक्षम असतील तर ते राष्ट्र आव्हानांच रूपांतर संधीमध्ये करू शकत. त्यामुळे राष्ट्रातील नागरिक हे सक्षम बनवणे अत्यंत गरजेचं असतं. नागरिकांना सक्षम बनवण्याचे एकमेव साधन म्हणजे शिक्षण होय. याच उद्देशाने प्रत्येक राष्ट्र आपलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ठरवत असतं आपल्या राष्ट्रासमोर बेरोजगारी, शिक्षण, पेयजल, भ्रष्टाचार, महागाई, ऊर्जा, पर्यावरण इत्यादी समस्या आहेत. या सर्व समस्यांवर विजयी होण्यासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची पायाभरणी करण्यात आलेली आहे.शालेय शिक्षणापासून तर उच्च शिक्षणापर्यंत शैक्षणिक दर्जा उंचावण्यावर या शैक्षणिक धोरणात भर दिल्यामुळे दर्जेदार शिक्षण मिळण्याची संधी निर्माण होते.या नव्या शैक्षणिक धोरणामुळे बाल्यावस्थेपासून अतिशय उत्तम दर्जाचे शिक्षण मिळण्याची संधी चालून आली आहे.
अभ्यासक्रम निवडीच्या लवचिक धोरणामुळे या शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार व गरजेनुसार शिक्षण घेऊ शकतात.प्रात्यक्षिक व अनुभवावर आधारित अध्ययन अध्यापनास प्रोत्साहन देण्याच्या धोरणामुळे रोजगारास सक्षम बनवणाऱ्या कौशल्यांचा विकास करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते.मातृभाषेबरोबरच शालेय स्तरावर किंवा उच्च शिक्षणामध्ये परराष्ट्रीय भाषांचे शिक्षण घेण्याचे धोरण बहुभाषिक बनण्याची संधी निर्माण करते असे मत व्यक्त करून आपल्या मनोगताची सांगता केली.या परिसंवादाचे सूत्रसंचलन व आभार प्रा.पी.एम.आडत यांनी केले. हे परिसंवाद यशस्वी करण्यासाठी डॉ.ए.एम.तांबोळी,प्रा.प्रा.पी.एम.आडत यांचे योगदान लाभले.