sangolamaharashtrapolitical

आजारी असतानाही आ.शहाजीबापू पाटील विधानपरिषदेच्या मतदानासाठी विधीमंडळात दाखल

जनतेच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी सोमवार १५ जुलै पासून आमदार शहाजीबापू पाटील हे आपल्या संपर्क कार्यालयात उपस्थित राहणार

HTML img Tag Simply Easy Learning    

आजारी असतानाही आ.शहाजीबापू पाटील विधानपरिषदेच्या मतदानासाठी विधीमंडळात दाखल

 

जनतेच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी सोमवार १५ जुलै पासून आमदार शहाजीबापू पाटील हे आपल्या संपर्क कार्यालयात उपस्थित राहणार

 

सांगोला (तालुका प्रतिनिधी): विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात उतरले असल्याने निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आजारी असतानाही शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील हे महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी विधीमंडळात दाखल झाले.

सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांना काही दिवसांपूर्वी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, नुकतेच ते बरे होऊन सांगोला तालुक्यातील आपल्या चिकमहूद या गावी आले होते. दरम्यान, विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात उतरले असल्याने निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी आमदार शहाजीबापू पाटील गुरुवारीच मुंबईला आले आहेत. सध्या आमदार शहाजीबापू पाटील यांची तब्येत ठणठणीत असून ते रात्री आमदार निवासात मुक्कामाला होते.

शुक्रवारी सकाळी आमदार शहाजीबापू पाटील हे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी विधीमंडळात दाखल झाले आणि त्यांनी महायुतीच्या उमेदवाराला मतदान केले. आमदार शहाजीबापू पाटील यांच्या तब्येतीबाबत सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. शहाजीबापूंची तब्येत ठणठणीत आहे.

 

जनतेच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी सोमवार १५ जुलै पासून आमदार शहाजीबापू पाटील हे आपल्या संपर्क कार्यालयात उपस्थित राहणार असल्याची माहिती शहाजीबापूंचे विश्वासू सहकारी माजी नगराध्यक्ष रफीक नदाफ यांनी स्पष्ट केले.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!