educationalsolapur

विजा, भज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्तीसाठी 15 जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

HTML img Tag Simply Easy Learning    

 

सोलापूर – परदेशात उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या महाराष्ट्रातील विजाभजइमाव व विमाप्र प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशात शिक्षण घेण्यासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये निवडीसाठी महाराष्ट्र शासनाच्या विजाभज, इमाव व विमाप्र विभागाकडून 15 जुलै 2024 पर्यंत अर्ज मागविण्यात येत असल्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक श्रीमती मनिषा फुले यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

 

शिष्यवृत्तीसाठी अटी व शर्ती पुढीलप्रमाणे – विद्यार्थी महाराष्ट्राचे रहिवासी असावेत. विद्यार्थ्यांच्या पालकांचे /कुटुंबातील सर्व सदस्यांचे एकत्रित सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न रु. 8.00 लाखापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली परदेशातील शिक्षण संस्था ही जागतिक क्रमवारी The (Time Higher Education)/ आणि OS World university ranking 200 च्या आतील असावी. शिष्यवृत्ती द्यावयाच्या एकूण जागेपैकी 30 टक्के जागेवर मुलींची निवड करण्यात येईल. अन्य अटी व शर्ती ह्या सविस्तर जाहिराती मध्ये तसेच विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग, शासन निर्णय दिनांक 11 ऑक्टोबर 2018 मध्ये नमूद केल्याप्रमाणे लागू राहतील. अर्जाचा नमूना, शासन निर्णय व अधिक सविस्तर माहितीसाठी पुढील संकेतस्थळाला भेट द्यावी. (A) www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील रोजगार या लिंकवर भेट द्यावी.

 

योजना शासन निर्णय इमाव, सावशैवमाप्र, विजाभज आणि विमाप्र कल्याण विभाग दिनांक 01 जुलै 2024 नुसार सदरचा अर्ज संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय महाराष्ट्र राज्य -1 यांचेकडे दि. 15 जुलै 2024 रोजी सायं. 06.15 पर्यंत जमा करावा.
लाभाचे स्वरुप पुढीलप्रमाणे – विद्यापीठाने प्रमाणित केलेल्या शिक्षणशुल्काची पूर्ण रक्कम. विद्यापीठाच्या निकषानुसार वैयक्तिक आरोग्य विमा खर्च. विद्यार्थ्यांस वार्षिक निर्वाह भत्ता परदेशातील संबंधित शैक्षणिक संस्थेने ठरवून दिलेल्या अथवा भारत सरकारच्या DCPT विभागाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे अथवा महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी जाहीर करेल ती रक्कम निर्वाह भत्ता म्हणून अनुज्ञेय असेल. विद्यार्थ्यांना परदेशात जाताना व अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर परत येताना विमान खर्च अनुज्ञेय असेल, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!