सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्पर्धा परीक्षांमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार सोहळा संपन्न

सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि स्पर्धात्मक यशाचे
कौतुक करण्यासाठी एक विशेष सत्कार सोहळा आयोजित केला. या कार्यक्रमात शाळेतील विविध
स्पर्धा परीक्षांमध्ये उच्च क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सन्मान करण्यात
आला.
या सत्कार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या शाळेच्या व्यवस्थापिका
सौ अनिता इंगवले यांनी विद्यार्थ्यांच्या परिश्रमाचे आणि त्यांच्या पालकांच्या पाठिंब्याचे कौतुक
केले. त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना आगामी काळात अधिक परिश्रम करण्याचे आणि
शाळेचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहन केले.
विद्यार्थ्यांनी आपले अनुभव आणि यशोगाथा सांगून इतरांना प्रेरणा दिली. या कार्यक्रमात
विद्यार्थ्यांच्या पालकांनीही आपले विचार मांडले आणि शाळेच्या अध्यापन पद्धतीचे आणि
त्यांच्या मुलांच्या यशात शाळेच्या योगदानाचे आभार मानले.
सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल अशा प्रकारे विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत राहील आणि
त्यांना त्यांच्या ध्येय साध्य करण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन देईल. असे शाळेच्या
मुख्याध्यापिका सौ प्रमोदिनी जाधव मॅडम यांनी मनोगतामध्ये व्यक्त केले. स्पर्धा परीक्षेच्या
विभाग प्रमुख सौ माधुरी पाटील मॅडम यांनीही मुलांना मार्गदर्शन करून स्पर्धा परीक्षेचे महत्त्व
सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.श्रुती हसबनीस यांनी केले.कार्यक्रम व्यवस्थित रित्या पार पडण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष कामगिरी केली.
यशस्वी विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे:-अभिरुप स्कॉलरशिप परीक्षेमध्ये सौम्या तानाजी खंडागळे] भाकरे युगंधर प्रसाद] बोराटे धनुष
राजेंद्र] वगरे धनश्री अनिल] गाडे विराज अमित] आस्था रमेश जाधव पाटील] रणसिंग शिवम
आबासाहेब] बोत्रे आरुषी महादेव] वाघमारे श्रीहर्ष बबन] पवार सोनम अमोल] मोरे श्वेता नवनाथ या
विद्यार्थ्यांनी यश मिळवले
तसेच एस.एस. फेलोशिप परीक्षेमध्ये मध्ये पुढील विद्यार्थ्यांनी यश मिळवले
माळी सार्थक अशोक, तेजस्विनी तानाजी जाधव ,मोरे श्वेता नवनाथ. तसेच स्कॉलरशिप
परीक्षेमध्ये माने समरजित सुशी सुशीलकुमार] माने समृद्धी गौरव यांनी यश मिळवले तसेच
डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेमध्ये अहमद असिफ खतीब व सिद्धेश अर्जुन गारळे
यांनी यश पटकावले. तसेच मंथन परीक्षेमध्ये आस्था रमेश जाधव पाटील हिने यश मिळवले.
त्याचबरोबर दहावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा व पालकांचाही सत्कार करण्यात आला.