युवा नेते डॉ. परेश खंडागळे यांच्या वाढदिवसानिमित्त 200 रुग्णांनी घेतला अल्प दरातील उपचाराचा लाभ
भव्य रक्तदान शिबिरामध्ये 41 रक्तदात्यांनी केले रक्तदान

११ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेचा अनुभव असलेले आणि सांगोल्यातील रुग्णांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या खंडागळे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे सर्वेसर्वा युवा नेते डॉ. परेश खंडागळे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दि.०५ जुलै ते बुधवार दि. १० जुलै २०२४ पर्यंत आयोजित केलेल्या अल्प दरातील विविध शस्त्रक्रिया मध्ये सुमारे 200 हून अधिक रुग्णांनी लाभ घेतला आहे. यासह वाढदिवसाचे औचीत्य साधून भरवण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरामध्ये 41 रक्तदात्यांनी रक्तदान करून डॉक्टर परेश खंडागळे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
वाढदिवस हा आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस म्हणून अनेक जण मौज, मजा, मस्ती करून साजरा करतात. परंतु सामाजिक बांधिलकी म्हणून खंडागळे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल चे सर्वेसर्वा डॉक्टर परेश खंडागळे यांच्या वाढदिवसानिमित्त इतरत्र न खर्च करता, गोरगरीब गरजू रुग्णांना अल्पशा दरात शस्त्रक्रिया करून मिळाव्यात या दृष्टीने शुक्रवार दि.०५ ते बुधवार दि. १० जुलै २०२४ पर्यंत अल्प दरात शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये शंभर ऑपरेशन करण्यात आले आहेत. गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया मध्ये रुग्णांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. इतर मोफत तपासणी मध्ये देखील रुग्णांनी मोठ्या संख्येने उपस्थित लावली. दरम्यान 50 फोन अधिक मोफत तपासणी केल्या आहेत.
खंडागळे मल्टी स्पेशालिटी मॅटर्निटी,.सर्जिकल मेडिसिन अस्थिरोग, नेत्ररोग त्वचारोग, बालरोग, कान-नाक-घसा, ट्रामा केअर सेंटर येथे सिझेरियन, प्रसूती, गर्भाशयाची पिशवी काढणे, २०,००० रुपये, दुर्बिणीद्वारे गर्भाशयाची पिशवी काढणे, कुटूंब नियोजन दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, गर्भाशयाची पिशवी साफ करणे, कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया टाक्यावरील, लेझरद्वारे मुळव्याध, फिशर व फिच्युला यावर उपचार, अपेंडीक्स ऑपरेशन, हर्निया ऑपरेशन, यासारख्या छोट्या ऑपरेशन वरही सवलतीच्या दारात शस्त्रक्रिया ठेवण्यात आल्या होत्या. या अल्पशा दरातील शस्त्रक्रियेसाठी रुग्णांनी उदंड प्रतिसाद दिला. आल्या प्रत्येक रुग्णांवर स्पेशलिस्ट डॉक्टरांमार्फत उपचार करण्यात आले.
खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सांगोला यांच्यावतीने यापूर्वी विविध उपक्रमाच्या माध्यमातून रुग्णांना अल्पशा दरात जास्तीत जास्त उपचार पद्धती देण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे नेहमीच चर्चेत असलेल्या खंडागळे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलच्या या उपक्रमात देखील रुग्णांनी उदंड प्रतिसाद दिला.