राजुरी , वाटंबरे, तिप्पेहाळी येथे लोणारी समाज जनजागृती गाव भेट दौरा संपन्न

समाजरत्न विष्णूपंत दादरे साहेब यांचे स्मारक सांगोला शहरात व्हावे व स्वर्गीय विष्णुपंत दादरे लोणारी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे या प्रमुख मागण्यांसाठी लोणारी समाज जनजागृती गावभेट दौरा काल , राजुरी , वाटंबरे, तीप्पेहळी, जुजारपुर या ठिकाणी पार पडला व या लोणारी समाज जनजागृती दौर्ऱ्याला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला, यावेळी लोणारी समाज सेवा संघ सांगोला तालुका अध्यक्ष ,सचिव व संघटनेचे पदाधिकारी तसेच लोणारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
सांगोला तालुक्यात लोणारी समाज हा प्रचंड मोठ्या संख्येने असुन तालुक्यातील लोकसंख्येचा विचार करीता हा समाज तिसर्या क्रमांकावर येत असुन लोणारी समाजाची सांगोला तालुक्यात पंचावन्न ते साठ हजार ईतकी लोकसंख्या असल्याचे मत लोणारी समाज अभ्यासकांचे आहे.लोणारी समाजाची लोकसंख्या ईतक्या मोठ्या प्रमाणावर असताना देखिल हा समाज आजही उपेक्षित व वंचित आहे.
क्षारपड जमिनीतुन मीठ बणवणे व चुना बणविणे हा या समाजाचा मुख्य व्यवसाय होता.पण काळाबरोबर हा व्यवसाय लुप्त पावला.आणि त्यामुळे या समाजावर उपासमारीची वेळ आली.परीणामी ऊसतोडी,माथाडी,विटभट्टी अशासारख्या कष्टाच्या कामाकरीता त्यांची भटकंती सुरु झाली.परीस्थीतिने नागावलेल्या या समाजाची मुले अर्धवट शिक्षण घेवू लागली.मुळातच शांतता प्रिय असलेल्या या समाजास शासन व प्रशासाने नेहमीच बेदखल केले.त्यामूळे शासन प्रशासनाविरोधात समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला असन तालुक्यातील लोणारी समाज आज पेटुन उठला आहे.आणि एका निर्णायक क्रांतीकारी लढ्यासाठी तो सज्ज झाला आहे.
या समाजाची आर्थिक उन्नती व्हावी म्हणुन समाजरत्न विष्णुपंत दादरे आर्थिक विकास महामंडळ व लोणारी समाजाची अस्मिता असणारे समाजरत्न विष्णुपंत दादरे यांचे स्मारक सांगोला शहरात मोक्याच्या ठीकाणी व्हावे.याकरीता सांगोला तालुका लोणारी समाज सेवा संघाच्या वतीने तालुक्यात जनजागृती यात्रा काढली जात आहे.या यात्रेला गावोगावी अभुतपुर्व प्रतिसाद मिळत असुन,या समाजाच्या शाशन व प्रशासनाच्या वतिने मागण्या माण्य न झाल्यास नजिकच्या काळात सांगोला तालुक्यात निर्णायक आंदोलन उभे करुन न्याय हक्क मिळत नाहित तोर्यत माघार घ्यायची नाहि.असा निर्धार व ठराव लोणारी बहुत गावात घेतले जात आहेत.त्यामुळे या समाजाच्या लढ्यामुळे तालुक्यात आगामी अगदी नजिकच्या काळात तिव्र जनआंदोलन उभे राहण्याची चिन्हे निर्माण झाली असुन लोणारी समाजाची रणनिती धक्कातंत्राचा वापर करु शकते अशी चर्चा सुरु झाली आहे.